17 April 2025 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

शिवसेनेला शह देण्यासाठीच नारायण राणे आणि कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद? - सविस्तर वृत्त

MP Narayan Rane

मुंबई ०८ जुलै : महाराष्ट्रात युतीतून बाहेर पडून महाविकास आघाडीत सामील झालेल्या शिवसेनेला शह देण्याच्या व्यूहरचनेचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे बघितले जात अाहे. काेकणातील प्रतिनिधित्वासाठी नारायण राणे, मराठवाड्यातून भागवत कराड, उत्तर महाराष्ट्रातून भारती पवार अाणि ठाणे जिल्ह्यातून कपिल पाटील यांना केंद्रात मंत्रिपदे दिली गेली. शिवाय भाजपचा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या हेतूनेही जातीय समीकरणे बांधत केंद्रीय मंत्रिमंडळ फुगवण्यात आले आहे.

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद:
राणे विरोधी पक्षनेते झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी २००३ साली महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड केल्यानंतर राणे दुखावले. २००४ साली त्यांनी शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मालवण विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून विक्रमी मताने निवडून आले. त्यांची आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्री पदी वर्णी लागली. २००८ मध्ये ते उद्याेग मंत्री झाले. मात्र मुख्यमंत्री हाेण्याच्या महत्त्वाकांक्षेतून त्यांनी काँग्रेसही साेडली. २०१८ मध्ये स्वत:चा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ काढला. याच दरम्यान नारायण राणे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेले. नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्षही भाजपमध्ये विलीन झाला.

कपिल पाटील यांना मंत्रिपद आणि आगरी समाजाची मतं:
ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजाला भाजपकडे ओढण्यासाठी भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजाचा विरोध आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कोळी-आगरी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे. पाटील यांना मंत्रिपद देऊन ठाणे, पालघर जिल्ह्यात शिवसेनेच्या विरोधात आगरी समाजाचा संघर्ष तीव्र करण्याची भाजपची रणनीती आहे. आगरी समाजाचे नेते अशी त्यांची ओळख आहे.

कपिल पाटील भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर गावचे सरपंच होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही भूषवले. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ व २०१९ मध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघातून विजय संपादित. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MP Narayan Rane and MP Kapil Patil got cabinet ministry against Shivsena news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या