18 January 2025 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना माहित नाही, चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म तिकीट, तात्काळ तिकिटापेक्षाही पडेल तिकीट Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा ITR Filing | या लोकांना पैसे कमावून सुद्धा टॅक्स भरावा लागत नाही, इन्कम टॅक्सही कृपा करतो, फायदा जाणून घ्या
x

..अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही | खा. नवनीत राणा संतापल्या

MP Navneet Rana Kaur, CM Uddhav Thackeray, Matoshri

अमरावती, ४ नोव्हेंबर: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर आणि अतिवृष्टीचा जोरदार आर्थिक फटका बसला आहे. ठाकरे सरकारने बळीराजासाठी १०,००० करोड रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच ही मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर वितरीत करण्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. परंतु, ही मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत तुटपुंजी असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतात अजून पंचनामे झाले नसल्याचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० मदत देण्याची घोषणा जाहीर केली होती. यावर राणा म्हणाल्या की, ‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक – सोयाबीनचे नुकसान होऊन ते पूर्ण हातातून गेले. यानंतर कपाशीवर मोठ्याप्रमाणात बोंड अळी आणि लाल्या रोग आला आहे. त्यामुळे कपाशीचे पीकसुद्धा वाया गेले आहे. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत ताबडतोब जाहीर करावी. दिवाळीपूर्वी बळीराजाच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी ५०,००० रुपये जमा करावी. अन्यथा मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर दिवाळी साजरी करू दिली जाणार नाही असा थेट इशाराच नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमवीर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या प्रमुख नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचे दौरे केले होते. यानंतर महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १०,००० करोडचे आर्थिक पॅकेज अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. फळबागांसाठी हेक्टरी २५,००० रुपये मदतीची घोषणा करण्यात आली होती.

 

News English Summary: Farmers in Maharashtra have been hit hard by floods and heavy rains. The Thackeray government has announced a grant of Rs 10,000 crore for farmers. The Chief Minister also announced to distribute this aid to the farmers as soon as possible. However, this aid is very meager for the farmers and a large number of farmers have not yet got their panchnama, said Amravati MP Navneet Rana.

News English Title: MP Navneet Rana Kaur criticized CM Uddhav Thackeray over farmers issues News Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x