22 January 2025 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

बिहार निवडणुका संपल्यावर महाराष्ट्रात शिवसेना विरोधी पक्षात बसेल - आ. रवी राणा

MP Navneet Rana, Shivsena, Bihar assembly elections 2020

मुंबई, २७ ऑक्टोबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली होती. त्यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी भाजपसहित, कंगना रानौत आणि राणे कुटुंबीयांचा खरपूस समाचार घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला होता. तर हिम्मत असेल तर राज्य सरकार पाडून दाखवा असं आव्हान देखील दिलं होतं.

राज्यातील सरकार पाडून दाखवाच अस थेट आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिल्या नंतर आता बिहार निवडणूका संपल्या की हे सरकार आपोआप पडणार असून शिवसेना ही विरोधी पक्षात दिसेल असे भाकीत अपक्ष आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलं आहे. तसेच उध्दव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यतील भाषणावरर देखील राणा यांनी कडाडून टिका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवरही आता टिकेचे झोड उठवली आहे. यातच मागील काही महिन्या पासून मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी देखील टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्या निवळ भाजप वर टीका केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांन विषयी ते तिथे एक शब्द ही काहीच बोलले नाही.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याबाबत ते काहीच बोलले नाही. दहा हजार रुपयांचे जे पॅकेज जाहीर केले त्यातून महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना इंच भर ही चांगलं होणार नाही. शेतकऱ्यांना केवळ हेक्टरी दहा हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याची टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे.

तत्पूर्वी, सरकार आम्ही पाडणार नाही पण हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला होता. सरकार पडलं तर अराजकता पसरेल असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केले होते. या मताशी मी सहमत नसल्याचे आठवले म्हणाले होते. भाजप शिवसेना २५-३० वर्ष एकत्र हिंदुत्वावर होते. संघाकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही संघात सगळे तयार झाले आहेत असे आठवले म्हणाले होते. भाजपवर टीका करताना शिवसेनेचे हिंदुत्व वेगळे कसे ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता.

 

News English Summary: Amaravati Independent MP Navneet Rana Kaur predicted that the Bihar elections would be over and Shiv Sena would be seen in the Opposition now that the Bihar assembly elections 2020 will over. Has expressed. MP Navneet Rana has also sharply criticized CM Uddhav Thackeray’s speech at the Dussehra rally.

News English Title: MP Navneet Rana said Shivsena will be in opposition after Bihar assembly elections 2020 News Updates.

हॅशटॅग्स

#Navneet Kaur Rana(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x