22 January 2025 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

'५० खोके एकदम ओके' घराघरात प्रसिद्ध झाल्यानंतर शिंदे गटातील नेते बावचळले?, बेछूट आरोपांना सुरुवात, तथ्य काय समजून घ्या

MP Prataprao Jadhav

CM Eknath Shinde | १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये जून महिन्यात सीबीआयने अनिल देशमुख यांच्याबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे, संदीप पलांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. मात्र सरकारी कर्मचारी किंवा कोणत्याही मंत्र्याविरुद्ध न्यायालयीन खटला चालवण्यासाठी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या सरकारकडून सॅन्क्शन ऑफ प्रॉसिक्युशनची आवश्यकता असते. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर शिंदे सरकारने सॅन्क्शन ऑफ प्रॉसिक्युशनची परवानगी दिली होती.

भारतीय दंड विधान म्हणजेच भादंविच्या १९ व्या कलमानुसार मंत्र्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायलयात खटला चालवण्यासाठी राज्यात सत्तेत असणाऱ्या सरकारकडून सॅन्क्शन ऑफ प्रॉसिक्युशनची आवश्यकता असते. शिंदे मंत्रीमंडळाच्या बैठकीत सीबीआयला ही परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सीबीआयला ही परवानगी देण्यात आल्याने देशमुखांविरोधातील हे प्रकरण ट्रायल स्टेजला हे पोहचेल असं म्हटलं गेलं.

चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेंचा मोठा खुलासा :
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैसे दिल्याचा सचिन वाझे यांनी इन्कार दिला आहे. 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपांप्रकरणी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर बडतर्फ एपीआय सचिन वाझे यांचा जबाब देशमुख यांच्या वकिलांनी घेतला होता. तेव्हा अॅडव्होकेट गिरीश कुलकर्णी यांनी विचारलेल्या प्रश्नांना वाझेंनी उत्तरं दिली होती. अनिल देशमुख किंवा त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही पैसे दिले का, या प्रश्नावर वाझे यांनी नकारार्थी उत्तर दिलं. त्यामुळे भाजपने अनिल देशमुख यांच्यावर केलेलं राजकीय आरोप सुद्धा खोटे असल्याचं म्हटलं गेलं.

भाजप नंतर शिंदे गटाचे खासदार ‘राजकीय आरोपां’ मुळे चर्चेत :
शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये नेले जात होते. सचिन वाझे हेच मातोश्रीवर हे खोके घेऊन जात होते, असा खळबळजनक दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या या आरोपांनंतर शिंदे गटात ‘५० खोके एकदम ओके’ टीकेमुळे प्रसिद्ध झाल्याने ते बेछूट आरोप करत असल्याचं म्हटलं जातंय. दुसरीकडे, जर खासदार प्रतापराव जाधव यांच्या आरोपात तथ्य असेल तर प्रथम सीबीआयने अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे, संदीप पलांडे यांच्याप्रमाणे खासदार प्रतापराव जाधव यांना चौकशीसाठी बोलावलं पाहिजे. दरम्यान, दसरा मेळावा होई पर्यंत शिंदे गट अशा राजकीय स्टंटबाजी करतंच राहणार अशी देखील चर्चा रंगली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MP Prataprao Jadhav allegations on Uddhav Thackeray check details 02 October 2022.

हॅशटॅग्स

#MP Prataprao Jadhav(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x