फडणवीस सरकारप्रमाणे ठाकरे सरकारनेही सर्वतोपरी प्रयत्न केले | त्यामुळे कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही - भाजप खा. संभाजीराजे

मुंबई, ५ मे | महाराष्ट्रातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. न्यायालयानं निकाल दुर्दैवी असल्याची भावना मराठा समाजाच्या विनोद पाटील यांनी व्यक्त केली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. त्यामुळे एकीकडे मराठा समाजाच्या लढ्याला अपयश तर दुसरीकडे हा अॅड. जयश्री पाटील-सदावर्ते यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं म्हटलं जातंय.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी फडणवीस सरकारप्रमाणे ठाकरे सरकारनेही सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो. परंतु, आजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्यानंतर ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आव्हान केले. सध्याची कोरोनाची स्थिती भयानक आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाचा उद्रेक होणे योग्य ठरणार नाही. आरक्षण घेण्यासाठी आधी आपण जिवंत राहिले पाहिजे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मराठा समाजाने कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन संभीजीराजे यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यामुळे आता काहीतरी मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज नाही. तुर्तास मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये जास्तीच्या जागा मिळण्यासाठी सुपरन्यमुररी हाच एकमेव पर्याय दिसत आहे. त्यासाठी राज्य सरकारला कोणत्याही परवानगीची गरज लागणार नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने सुपरन्युमररी सूत्राचा वापर करून शैक्षणिक संस्थांमधील जागा वाढवाव्यात, असे संभीजीराजे यांनी सांगितले.
News English Summary: Like the Fadnavis government, the Thackeray government did its best to maintain the Maratha reservation in the Supreme Court. So there is no point in blaming anyone. I respect the decision of the Supreme Court. However, today is an unfortunate day for the Maratha community, said MP Sambhaji Raje.
News English Title: MP Sambhaji Raje express his opinion over Maratha Reservation cancel decision of Supreme court news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN