23 February 2025 8:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

गृहमंत्र्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं | संभाजीराजेंनी सुद्धा मान्य करत म्हटलं 'माझं समाधान झालंय'

MP Sambhaji Raje

कोल्हापूर, ३१ मे |  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता सरकारवर गंभीर आरोप केलाय. संभाजीराजे यांनी याबाबत ट्वीट केलंय. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला होता. राज्याचा इंटेलिजन्स विभाग पाळत ठेवत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्याबाबत संभाजीराजे यांच्या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली होती. या ट्वीटमध्ये संभाजीराजे यांनी केंद्र की राज्य सरकार असा उल्लेख केलेला नव्हता.

यावरून नव्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच, आता संभाजीराजेंनी स्वतः याबाबत खुलासा केला आहे. आताच गृहमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले, कालच्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीच्या ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची चूक झाली. मात्र त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे. मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर समाधानी असून हा विषय संपला आहे.” असं संभीजीराजे यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.

 

News English Summary: Sambhaji Raje himself has revealed this. The Home Minister had just received a call. He said it was a mistake for the lower staff to come into the Collector’s Chamber inside the meeting place. But their purpose was not espionage. They must have done so for my safety. I am also satisfied with his statement and the matter is over. ” This has been stated by Sambhiji Raje through a tweet

News English Title: MP Sambhaji Raje himself has revealed this after call of Home minster Dilip Walse Patil news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x