22 December 2024 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका
x

ठरलं | उदयनराजे आणि संभाजीराजे आज पुण्यात भेटणार

Maratha reservation

पुणे, १४ जून | मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर येत्या 16 जूनला कोल्हापुरातून मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जाणारी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीची वेळ अखेर ठरली आहे. आज पुण्यात दुपारी एक वाजता संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले भेटणार आहेत.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर रात्यात त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले. मराठा समाजामधून या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेतली आणि राज्यभर दौरे केले. सध्या राज्यात मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून संभाजीराजे यांच्याकडे पाहिले जात आहेत. त्यांनी 16 जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याची घोषणाही केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची उदयनराजेंसोबतची बैठक महत्वाची असणार आहे. आजच्या बैठकीत नेमके काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

विशेष म्हणजे, आज सकाळी कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यू पॅलेस येथे जाऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे सुद्धा उपस्थितीत होते. या भेटीमुळे कोल्हापूरमध्ये चर्चेंना उधाण आले आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहे. आज सकाळी अचानक अजित पवार यांचा ताफा न्यू पॅलेसकडे वळला. अजित पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. तब्बल तासभर ही बैठक सुरू होती. यावेळी मराठा संघटनेचे काही नेते सुद्धा उपस्थितीत होते, अशी माहिती समोर आली आहे.

 

News Title: MP Sambhajiraje Chhatrapati  and Udayanraje will meet today at Pune over Maratha Reservation issue news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x