22 January 2025 10:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
x

श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या - संभाजीराजे छत्रपती

Maratha reservation

औरंगाबाद, २६ मे | मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे. अशात खासदार संभाजीराजे सध्या महाराष्ट्राभर दौरा करत मराठा समाजाच्या व्यथा जाणून घेत आहेत. आज (२६मे) औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे यांनी भाष्य केले आहे. गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला ‘सत्ताधारी’ ठरवलं म्हणून आम्ही गप्प बसायचं का? आम्हाला कायद्याशी देणघेणं नाही. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी लागू केलेली रचना आजच्या महाराष्ट्राला लागू झालीच पाहिजे. बहुजनांना जो न्याय मिळाला तो मराठा समाजालाही मिळालाच पाहिजे, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

इतर बहुजन समाजाताली लोकांना जो न्याय मिळतो तोच मराठा समाजातील लोकांना मिळावा अशी आमची भूमिका आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांनी जी रचना रचली आहे ती आता महाराष्ट्राला लागू होत नाही का? अशी विचारणाही यावेळी संभाजीराजेंनी राजकीय नेत्यांना केली. ते औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

समाजाची अस्वस्थता जाणून घेण्याचा माझा प्रयत्न
जे राज्याच्या हातात आहे ते राज्याने आणि केंद्राने त्यांच्या हातात आहे ते करावं आणि मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढावा अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. “मी कोणत्याही राजकीय नेत्यांना भेटणं टाळलं आहे. समाजाची अस्वस्थता जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे,” असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. २७ ऐवजी आपण २८ तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचं यावेळी त्यांनी जाहीर केलं आहे.

 

News English Summary: Our role is to ensure that the people of the Maratha community get the same justice as the people of other Bahujan communities. Doesn’t the structure devised by Chhatrapati Shivaji Maharaj and Rajarshi Shahu Maharaj now apply to Maharashtra? said MP Sambhajiraje Chhatrapati at Aurangabad press conference.

News English Title: MP Sambhajiraje Chhatrapati at Aurangabad press conference over Maratha Reservation news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x