शरद पवार यांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी | खा. संभाजीराजेंची मागणी
नवी दिल्ली, १५ सप्टेंबर : सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणला स्थगिती दिली आहे. त्यावरून मराठा बांधव नाराज झाले असून त पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी जवळपास 5 ते 6 फार्म्युले सुचवल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे. शरद पवार यांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी, असा आग्रही खासदार संभाजीराजे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिल्यानंतर विरोधी पक्ष भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यास राज्य सरकारच जबाबदार ठरवलं जात आहे. त्यात मराठा संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत खासदार संभाजीराजेंनी शरद पवारांकडे एक आग्रह केला. शरद पवारांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
दुसरीकडे कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नाबाबत सक्रिय झालेल्या शरद पवार यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्याबाबत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी काल रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली होती. वरील विनंतीला अनुसरून मी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली.
News English Summary: The Supreme Court has postponed the Maratha reservation. The Maratha brothers are upset over this and are again in the sanctity of the movement. Against this backdrop, MP Chhatrapati Sambhaji Raje met NCP President Sharad Pawar in Delhi on Tuesday. In this meeting, MP Sambhaji Raje has informed that Sharad Pawar has suggested about 5 to 6 formulas on the issue of Maratha reservation.
News English Title: MP Sambhajiraje Chhatrapati meet Sharad Pawar in Delhi on Maratha reservation Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो