24 November 2024 6:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

मुंबई मनपा शिवसेनेकडेच राहील | पण नाशिकचा पुढचा महापौर सुद्धा शिवसेनेचाच असेल

MP Sanjay Raut, BMC, Nashik Municipal corporation

मुंबई, १२ डिसेंबर: संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेऊन हा विश्वास व्यक्त केला. नाशिकमधील बदलाविषयी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा आमचा विचार आहे. बाकी निवडणुका तुम्ही पाहिल्याच आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलो आणि इतरांचे बालेकिल्ले ढासळले, असा खोचक टोला लगावतानाच जनतेचा कौल शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या (Shivsena, NCP and Congress MahaVikas Aghadi) बाजूने आहे. ठाकरे सरकारच्या बाजूने आहे. नाशिकमध्ये देखील महाविकास आघाडीचा विचार केला तर शिवसेना पहिल्या नंबरवर आहे. परंतु सर्वांचा सन्मान राखूनच निवडणुका लढवल्या जाणार आहेत. कोणी कोणा बरोबर गेलं तरी मुंबई महानगर पालिका शिवसेनेकडेच राहील आणि नाशिकचा पुढचा महापौर देखील शिवसेनेचाच होईल, असं संजय राऊत म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने मिशन मुंबई सुरू केलं असल्याचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतीय जनता पक्षसोबत जाण्याचा मुद्दा यावेळी पत्रकारांकडून उपस्थित करण्यात आला. त्यावर भाष्य करताना खासदार संजय राऊत म्हणाले,”आता हैदराबादमध्ये त्यांना ओवेसी मिळाले. मुंबईत कुठल्या पक्षातून ते ओवेसी निर्माण करतात, ते बघावं लागेल,” असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या चर्चेवर खासदार संजय राऊत म्हणाले, ”जाऊ द्या ना, कुणीही कुणाबरोबर गेलं, तरी देखील मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहिल. सध्याच्या स्थितीत काहीही बदल होणार नाहीत. मी नाशिकला देखील आता बोलतोय की, पुढचा नाशिकचा महापौर शिवसेनेचाच असेल,” असा विश्वास संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी व्यक्त केला.

 

News English Summary: In Nashik too, Shiv Sena is at number one considering Mahavikas Aghadi. But elections will be fought with respect for all. No matter who goes with whom, Mumbai Municipal Corporation will remain with Shiv Sena and the next mayor of Nashik will also belong to Shiv Sena, said Sanjay Raut.

News English Title: MP Sanjay Raut talked about BMC and Nashik Municipal corporation election news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x