लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार गेले आहेत, किती दिवस लोकांना घरात बसा सांगणार

नवी दिल्ली, २२ जुलै : आज देशातील राज्यसभेच्या नवनिर्वाचित 61 पैकी 44 खासदारांनी खासदारकीची शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी या खासदारांना शपथ दिली. महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांनी यावेळी हिंदीतून शपथ घेतली. तर उदयनराजे भोसले व व रामदास आठवले यांनी इंग्रजीतून गोपनीयतेची व एकनिष्ठतेची शपथ घेतली. शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी चक्क मराठीतून शपथ घेतली. काँग्रेसचे राजीव सातव आणि भाजपाचे भागवत कराड यांनीही मराठीतून शपथ घेतली. कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे फौजिया खान या शपथविधीला हजर नव्हत्या.
मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता घालविणारे आणि भाजपात जाऊन खासदार बनणारे ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांनीही खासदारकीची शपथ घेतली. त्यापूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया आणि दिग्विजयसिंह हे एकत्र बसून हसत-खेळत गप्पा मारताना लोकांना दिसले.
दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानावरुन प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी पवारांना लक्ष्य केले. ‘भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात सर्व जातींमध्ये सलोखा राहिला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या विचाराचे स्वतंत्र आहे’, असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत विधानावर साधारण प्रतिक्रिया दिली.
‘कोरोनाचा कठीण काळ आहे.पण घरी थांबून चालणार नाही. आतापर्यंत लोकांना केंद्रबिंदू म्हणूनच आजवर काम करत आलो. जेव्हा पद नव्हतं तेव्हा समाजकारण केलं, राजकारण कधीच केले नाही. गेल्या तीस वर्षात जेवढी समाजाची सेवा करता येईल तेवढी केली. राज्यसभेच्या संधीचा पुरेपूर लोकहितासाठी वापर करेन. केवळ सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करत राहीन’ असेही उदयनराजेंनी म्हटले. तसेच, ‘कोरोनावर लवकरात लवकर लस निघाली पाहिजे. लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार हिरावले आहेत. किती दिवस सांगणार लोकांना घरात बसून राहा, उद्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल’ अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली.
News English Summary: MP Udayan Raje Bhosale indirectly targeted the NCP leader even before he was sworn in as an MP. Speaking to the media on the statement made by Sharad Pawar about Ram Mandir, he targeted Pawar. ‘In such a big country like India, there should be harmony among all castes.
News English Title: MP Udayan Raje says about Sharad Pawar statement on Ram Mandir News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL