22 February 2025 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा
x

वडील ST महामंडळातील निवृत्त वाहक, मुलगा रविंद्र शेळके झाला उपजिल्हाधिकारी

MPSC Exam, Ravindra Shelke, Deputy Collector

मुंबई 19 जून : राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल काल लागला. प्रसाद चौगुले याने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅच मध्ये ४२० अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांना गेली अनेक दिवस या निकालांची प्रतिक्षा होती. 13 ते 15 जुलै 2019 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा २०१९ रोजी १७ फेब्रुवारी २०१९ ला मुंबईसह अन्य ३७ केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेच्या पूर्व परीक्षेकरता ३ लाख ६० हजार ९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेतून ६ हजार ८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. प्रस्तुत मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै २०१९ रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली होती. त्याचा निकाल काल जाहीर करण्यात आला.

दरम्यान, मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम आलेल्या रविंद्र शेळके या तरुणाचा संघर्ष पाहणार आहोत. कळंब तालुक्यातील बोर्डा गावच्या रवींद्र शेळके यांनी राज्यात दुसरा येऊन उपजिल्हाधिकारी पदावर शिक्कामोर्तब केला आहे. रवींद्र शेळके यांचे वडील हे एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते. नुकतेच ते त्यातून निवृत्त झाले आहेत. मुलाच्या यशाने वडील भारावून गेले आहेत.

प्रतिकूल परिस्थितीत सुरुवातीला एमबीबीएस पदवी प्राप्त करून त्यावर समाधान न मानता रवींद्र यांनी राज्यसेवेच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि त्यांच्या मेहनतीला यश आले आहे. रवींद्र यांनी आपलं शालेय शिक्षण कळंब शहरातील सावित्रीबाई फुले शाळेत पूर्ण केले तर अकरावी बारावीचे शिक्षण लातूर येथील महाविद्यालयात पूर्ण करून मुंबईतील लोकमान्य टिळक मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथून एमबीबीएसची पदवी घेतली.

मागील काही कालावधीपासून ते दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारूनसुद्धा पुढे यूपीएससीची तयारी सुरू ठेऊन त्यात यश मिळवायचे.

 

News English Summary: We will see the struggle of Ravindra Shelke, who came first from the backward class. Ravindra Shelke of Borda village in Kalamb taluka has come second in the state and has sealed the post of Deputy Collector. Ravindra Shelke’s father was working as a carrier in ST Corporation.

News English Title: MPSC Board Exam Ravindra Shelke of Borda village in Kalamb taluka has come second in the state and has sealed the post of Deputy Collector News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x