23 December 2024 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मोदींच्या खोट्या १५ लाखांपेक्षा...संकटकाळात प्रत्यक्ष मिळणारे १५०० रुपये लाखमोलांचे - भाई जगताप

Vaccination Utsav

मुंबई, १५ एप्रिल:

मुंबई, १५ एप्रिल: महाराष्ट्रातील दररोज वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा मोठा असल्याने राज्य सरकारची चिंता चांगलीच वाढली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१४ एप्रिल) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज ५८ हजार ९५२ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच गेल्या २४ तासांत नवीन ३९ हजार ६२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण २९ लाख ५ हजार ७२१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सध्या राज्यात एकूण ६ लाख १२ हजार ७० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.२१ % झाले आहे. सध्याची कोरोनास्थिती नियंत्रणात आणणे हे राज्य सरकारपुढचे सर्वात मोठे आव्हान आहे.

एका बाजूला देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रकोप सुरु असताना दुसऱ्या बाजूला औषधं आणि लसींचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. देशातील पहिला लॉकडाऊन जाहीर करताना मोदींनी काही दिवसात थाली आणि दियाबत्तीचे प्रयोग केले होते आणि त्यानंतर लोकांनी रस्त्यांवर आपत्तीचा उत्सव साजरा केला होता. आता देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे आणि स्मशान भूमीत देखील वेटिंग असल्याचं पाहायला मिळतंय.

एकाबाजूला महाराष्ट्रात कडक निर्बंध जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारने गरीब घटकांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. दरम्यान, २०१४ मध्ये मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला काळ्या पैशाचा संदर्भ देताना १५ लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटवर येण्याचे स्वप्न दाखवले होते. त्यालाच अनुसरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप यांनी मोजक्या शब्दात मोदी सरकार आणि भाजपाला टोला लगावला आहे. त्यासंदर्भात ट्विट करताना भाई जगताप यांनी म्हटलं आहे की, “मोदींजींच्या खोट्या १५ लाखांपेक्षा…..संकटकाळात प्रत्यक्ष मिळणारे १५०० रुपये लाखमोलांचे..!!

 

 

News English Summary: Following that, Mumbai Congress President A. In a few words, Bhai Jagtap has slammed the Modi government and the BJP. In this regard, while tweeting, Bhai Jagtap has said, “More than Modiji’s fake 15 lakhs ….. rupees.

News English Title: Mumbai congress president MLA Bhai Jagtap critisized PM Narendra Modi’s Vaccination Utsav call news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x