22 February 2025 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरलं! समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार

Eknath Shinde, Balasaheb Thackeray, Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg

मुंबई: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. हा मार्ग ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

“मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव देण्यात यावा असा प्रस्ताव ठेवला. सर्वांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. बाळासाहेबांचं महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाचं योगदान आहे. बाळासाहेबांच्या संकल्पेतून गडकरींच्या मार्गदनाखाली मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तयार झाला होता. त्यामुळे गेमचेंजर ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्यावं अशी आमची भावना होती,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उद्धव ठाकरेंनी पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहेत, तसेच राज्यातील दुय्यम न्यायालयातील १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  1. राज्यातील दुय्यम न्यायालयातील १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मान्यता.
  2. महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून ५ हजार ३५० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता.
  3. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी.
  4. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही महसुली अधिकाऱ्यास आता अधिकार. अध्यादेशाचे अधिनियमात रुपांतर करण्यास मान्यता.

 

Web Title: Mumbai Gagpur Samruddhi Mahamarg will be Named After Balasaheb Thackeray says Minister Eknath Shinde

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x