22 January 2025 10:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

सिनियर PI, PSI आणि API पदावरील अधिकाऱ्यांच्या लवकरच मुंबई बाहेर बदल्या | 727 जणांची यादीही तयार

Mumbai Police

मुंबई, ३० जून | महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस खात्यामध्ये ८ वर्षांहून अधिक काळ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीच्या काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिन कांड्या सापडल्या होत्या. यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. यादरम्यान महाराष्ट्र पोलिसांच्या एकंदरीत प्रतिमेला धक्का लागल्याची चर्चा पोलीस खात्यात सध्या सुरू होती. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई व पुणे परिसरामध्ये आठ वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या ७२७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत.

यापूर्वी झाल्या होत्या ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या:
या अगोदर २४ मार्च रोजी ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये ६५ पोलीस अधिकारी असे होते. जे मुंबई पोलीस खात्यातील क्राईम ब्रांचमध्ये बरीच वर्षे काम करत आले होते. या 65 पोलीस अधिकाऱ्यांमध्ये 28 पोलीस निरीक्षक, 17 सहाय्यक पोलीस निरीक्षक व 20 पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai Police officers who completed 8 years to be transferred in Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x