16 January 2025 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

मुंबई-पुण्यात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो - आरोग्यमंत्री

Health Minister Rajesh Tope, Lockdown, corona crisis

मुंबई, २५ एप्रिल: सध्या देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या तीन मे रोजी संपणार आहे. पण मुंबई आणि पुणे या दोन शहरात लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. मुंबई, पुण्यामध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या दोन शहरात १८ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी लाइव्ह मिंटशी बोलताना ही माहिती दिली.

कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्याच्या उद्देशाने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. संक्रमणाचा वेग कायम असेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय अन्य कोणता पर्याय नसेल, असे राजेश टोपे यांनी मिंटला दूरध्वनीवरुन दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. सर्व कंटेन्मेंट झोन पूर्णपणे बंद आहेत की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. गरज पडल्यास ३ मेनंतर फक्त मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये आम्ही आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो, असेही ते म्हणाले.

राज्यात सध्या ५१२ कंटेन्मेंट झोन आहेत. गेल्या ७ एप्रिलपासून कोंढवा आणि जुन्या पुण्यातील बाजारपेठा बंद आहेत. गेल्या महिन्याभरात मुंबई-पुण्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले होते. याचाच अर्थ असा की पुणे आणि मुंबईतील सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन सुरू ठेवावा लागेल. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रम, सोहळे-समारंभांवर १८ मेपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. ३ मेनंतर मुंबई-पुण्यातील हॉटस्पॉट परिसरात कमीत कमी १५ दिवस कुठल्याही बिगर महत्त्वाच्या सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

News English Summary: Currently, the second phase of lockdown is underway in the country. The lockdown will end on May 3. But the lockdown period could be extended in Mumbai and Pune. The number of patients infected with corona virus in Mumbai and Pune is steadily increasing. Therefore, the lockdown period in these two cities can be extended till May 18. This information was given by Maharashtra Health Minister Rajesh Tope while talking to Live Mint on Saturday.

News English Title: Mumbai Pune lockdown may be extended till 18 May Maharashtra State health minister Rajesh Tope.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x