26 December 2024 1:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

लॉजवरील पोलिस धाडीत तब्बल १३ कॉलेज जोडपी ताब्यात; पालक धास्तावले

college couples on lodge, Nagpur Police, Chandrapur Police

नागपूर: चंद्रपुर इथे नागपूर महामार्गावरील जनता चौक इथल्या रेणुका गेस्ट हाऊसमध्ये काही गैरप्रकार सुरु असल्याची माहिती स्थानिक रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, स्थानिक पोलिसांनी कारवाई केली, तेव्हा रेणुका गेस्ट हाऊसच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये एकूण १३ महाविद्यालयीन जोडपी आढळून आली. या सर्व जोडप्यांना रामनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गेस्ट हाऊस मालक आणि त्याचा साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

चंद्रपुरातील नागपूर महामार्गावरील जनता चौक येथील रेणुका गेस्ट हाऊसमध्ये काही गैरप्रकार सुरु असल्याची माहिती स्थानिक रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई केली, तेव्हा या गेस्ट हाऊसच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये १३ कॉलेजची जोडपी आढळून आली. या सर्व जोडप्यांना रामनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गेस्ट हाऊस मालक आणि त्याचा साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, पाल्यांच्या या कृत्यावरून त्यांचे पालक देखील प्रचंड धास्तावल्याचं चित्र आहे. एकूणच मुलांना मोठया प्रमाणावर पैसे खर्च करून मोठ्या विश्वासाने पालक शिक्षण देतात, मात्र ते शिक्षणाच्या नावाने घरातून बाहेर पडून अशी कृत्य करत असल्याने मुलांच्या भविष्यकाळाविषयी पालकांची चिंता वाढली आहे. आज पकडली गेली मुलं यापूर्वी अजून किती वेळा अशी कृत्य करून बसली आहेत याचीच चिंता पालकांना सतावत आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जर सज्ञान व्यक्ती स्वमर्जीने कुणासोबत जर हॉटेल ,गेस्ट हाउस सारख्या ठिकाणी सापडली तर त्यात काही गैर नाही असं कायदा सांगतो.

 

Web Title:  Nagpur Police raid on lodge in Chandrapur total 13 college couples took into custody.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x