25 April 2025 8:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल
x

विरोध होत राहिला तर नाणार प्रकल्प गुजरातला जाईल : फडणवीस

मुंबई : कोकणात जर नाणार प्रकल्पाला असाच विरोध कायम राहिला तर तीन लाख कोटींचा हा प्रकल्प गुजरातला जाऊ शकतो असा अप्रत्यक्ष संदेशच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे. गुजरात राज्य सरकारने अराम्को कंपनीला यापूर्वीच आमंत्रित केलं आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात सत्तेत असलेली शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा या ऑईल रिफायनरी प्रकल्पाला विरोध आहे. या प्रकल्पामुळे एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. परंतु कोकणातील नेत्यांचा विरोध पाहता या प्रकल्पाचा मार्ग कठीण होताना दिसत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सूचक इशारा दिला आहे.

सौदी अरेबियन कंपनी अराम्को भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राच्या हद्दीतच ऑईल रिफायनरीचा प्रकल्प टाकू इच्छिते म्हाणून महाराष्ट्र सरकारने त्यांना तसा प्रस्ताव दिला आहे. परंतु या ऑईल प्रकल्पामुळे कोकणाच्या निसर्गाची आणि नद्यांची प्रचंड हानी होऊन आहे तसेच येथील मासेमारीचा पारंपरिक उद्योग नष्ट होईल अशी भीती स्थानिकांना असल्याने त्याचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे.

आजच नाणार मधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony