18 April 2025 1:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपच्या पॅनलचा धुव्वा

Nanded District Central Co operative Bank, Ashok Chavan, MP Pratap Patil Chikhalikar

नांदेड, ५ एप्रिल: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकत महाविकासआघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर महाविकासआघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते व उमेदवारांचे पालकमंत्री अशेक चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने १३, राष्ट्रवादी काँग्रेसने ३ तर शिवसेनेने १ जागा जिंकून विरोधकांवर एकतर्फी मात केली आहे.

या विजयाने अशोक चव्हाण यांची नांदेडमधील पुन्हा सिद्ध झाली आहे. रविवारी झालेल्या मतमोजणीत २१ पैकी १७ जागांवर महाविकास आघाडीच्या पॅनेलने यश मिळविले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपचे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून केवळ चार जागांवर त्यांना समाधान मानावे लागले.

दरम्यान, शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या या बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व संचालक प्रामाणिक प्रयत्न करतील, याची खात्री असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. जिल्हा बॅंकेची परिस्थिती आज काय आहे, ते लपून राहिलेले नाही. मागील काही वर्षात एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या या संस्थेची वाताहत झाली आहे. ही बॅंक वाचवण्यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून १०० कोटी रूपयांचे अनुदानही मिळवून दिले. पण बॅंकेला चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असून, महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे नवनिर्वाचित संचालक त्या दिशेने पराकाष्ठा करतील, याचा विश्वास असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

 

News English Summary: In the Nanded District Central Co-operative Bank election, Mahavikasaghadi has won 17 out of 21 seats. After this victory, Guardian Minister Ashok Chavan has congratulated all the leaders, activists and candidates of the Samarth Sahakar Panel of Mahavikas Aghadi.

News English Title: Nanded District Central Co operative Bank election Mahavikasaghadi victory against BJP panel news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AshokChavan(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या