5 November 2024 2:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News
x

मराठा आरक्षण | खा. संभाजी राजे यांच्या ३ पत्रांना पंतप्रधानांकडून अद्याप उत्तर नाही

PM Narendra Modi, Maratha reservation, MP Sambhaji Raje, Marathi News ABP Maza

कोल्हापूर, २४ सप्टेंबर: सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच मराठा नेत्यांनी १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे घेऊ, पण समाधानी प्रतिसाद मिळाला नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर येईल असं सांगण्यात आलं आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून परिषदेची सुरूवात करण्यात आली. भरत पाटील यांनी स्वागत केले, पुंडलिक जाधव यांनी प्रास्ताविक केले. संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, परिषदेत केलेले ठराव मुख्यमंत्री, राज्यपालांसह सर्व राज्यकर्त्यांना पाठवले जाणार आहेत. आम्हाला चर्चेला बोलावू नका, मात्र या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्या. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत लढाई कायम राहणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी खासदार संभाजी राजे यांनी तीन पत्रे पाठवली होती. मात्र या पत्रांना पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून अद्याप उत्तर मिळालेले नाही.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार छत्रपती संभाजी राजे हे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आतापर्यंत तीन पत्रे पाठवली आहेत. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या सह्या या पत्र्यांवर होत्या. मात्र या पत्रांना अजून उत्तर मिळू शकलेले नाही. या संदर्भातील वृत्त टीव्ही 9 मराठीने प्रसारित केले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या अ‍ॅटॉर्नी जनरलबाबतचा निर्णय़ सरकारने घेतला पाहिजे. अ‍ॅटॉर्नी जनरलचा निर्णय आणि सरकारचा निर्णय हा एक असला पाहिजे. कारण अ‍ॅटॉर्नी जनरल ह सरकारचा माणूस आहे, असे संभाजी राजे यांनी सांगितले.

 

News English Summary: MP Chhatrapati Sambhajiraje has so far sent three letters to Prime Minister Narendra Modi to discuss the issue of Maratha reservation. The letters were signed by MPs from all parties in Maharashtra. However, these letters have not been answered yet. The news in this regard has been broadcast by TV Nine Marathi.

News English Title: Narendra Modi avoids discussion on Maratha reservation MP Sambhaji Rajes three letters have not been answered yet Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x