22 February 2025 9:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

PM केअरचा केअरलेस कारभार | दत्तक नाशिकला ६० व्हेंटीलेटर्स तेही कनेक्टर शिवाय, रुग्णांचे हाल सुरूच

Nashik oxygen leak

नाशिक, ०६ मे : राज्यातील कोरोनस्थिती चिंताजनक असताना दुसरीकडे नाशिकमध्ये एक दुर्घटना घडली. नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल २४ कोरोनाग्रस्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, राज्य सरकारकडून या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर आता मुदतीपूर्वीच या ७ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला असून ही दुर्घटना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचे ह्यात नमूद करण्यात आले आहे.

भाजपाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेतील वास्तव अखेर समोर आलं आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय हे महापालिकेचे असून, महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापालिकेनेच न्यू बिटको व झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्या बसविण्याचा ठेका दिला होता. संवेदनशील विषय असताना देखील संबंधित ठेकेदारांचा टेक्निशन तेथे उपलब्ध झाला नव्हता.

दरम्यान, नाशिकमधील दुर्घटनेचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारकडून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली या चौकशी समितीला १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता मुदतीपूर्वीच हा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नाशिकच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने २४ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे, नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर आता नाशिक महानगरपालिकेसंबंधित अजून एक भोंगळ कारभार समोर आला आहे. नाशिक शहरात ऑक्सिजनमुळे रुग्णांचे हाल होतं असताना आता वेंटीलेटर्सची देखील कमतरता आहे. मात्र दुसरी धक्कादायक गोष्ट याच वेंटीलेटर्स बाबतीत घडली आहे. पीएम केअर निधीतून नाशिक महानगरपालिकेला एकूण ६० वेंटीलेटर्स खरे मात्र ते सर्व कनेक्टर शिवाय प्राप्त झाल्याने धूळ खात पडले आहेत. रुग्णांना वेंटीलेटर्सची अत्यंत गरज असताना असा निष्काळजीपणा कसा काय होऊ शकतो असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. मोदी सरकारच्या उत्तर उत्तर नियोजनासाठी टाळ्या असं सचिन सावंत यांनी खोचकपणे म्हटलं आहे.

 

News English Summary: Modi govt sent 60 ventilators to Nasik corp before 10 days through PM Cares Funds. But they sent it without connectors. Hence lying unused. When there is dire need of ventilators, can we expect such negligence? Applause to Modi govt’s grt planning and management said congress leader Sachin Sawant.

News English Title: Nashik municipal corporation received 60 ventilators without connectors which are now lying unused news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x