लोटसचं ऑपरेशन सुरूच | भाजपचे ३ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर
नवी मुंबई, २९ डिसेंबर: मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी, माजी तसेच विद्यमान आमदारांनी भाजपाला रामराम करत महाविकास आघाडीतील पक्षात जाण्याचा सपाटा लावला आहे. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर भाजपाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळालं.
भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आजी-माजी आमदार राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करत आहेत. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला तर सुशिक्षित उमेदवारांनी महाविकास आघाडीला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे पुणे आणि नागपूर मध्ये देखील भाजपाला पराभव पत्करावा लागला होता आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं मनोधैर्य खचलं आहे. राष्ट्रवादी नंतर शिवसेनेने देखील भाजपाला महापालिका निवडणुकीपूर्वी धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंमुंबईत नवीन गवते , दिपा गवते आणि अपर्णा गवते हे भारतीय जनता पक्षाचे नगरसवेक लवकरच शिवबंधन बांधणार आहेत. थोड्याच वेळात वर्षा निवासस्थान येथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत औपचारिक पक्षप्रवेश होणार आहे. भाजप नेते गणेश नाईक यांचे हे नगरसवेक खंदे समर्थक आहेत. त्यामुळे भविष्यत अजून नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. (BJP corporators Navin Gwate, Deepa Gwate and Aparna Gwate join Shivsena)
News English Summary: Bharatiya Janata Party (BJP) corporators Navin Gwate, Deepa Gwate and Aparna Gwate will soon form Shivbandhan in Navi Mumbai. A formal party entry will be held in the presence of Uddhav Thackeray at Varsha’s residence shortly. He is a staunch supporter of BJP leader Ganesh Naik. Therefore, there is a possibility that more corporators will join Shiv Sena in future.
News English Title: Navi Mumbai BJP corporators will soon join Shivsena party before corporation elections news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON