राजकीय ठोकताळा | त्यामुळेच राष्ट्रवादी आणि शिवसेना २०२४ मध्ये एकत्र निवडणुका लढतील? - सविस्तर वृत्त
मुंबई, १७ जून | २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनपेक्षितपणे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि अनपेक्षितपणे शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या प्रचारात दिल्लीतील वरिष्ठांनी म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी राज्यात प्रचारसभा देखील घेतल्या नव्हत्या. अगदी राहुल गांधी यांनी यांनी निवडक १-२ प्रचार सभा घेतल्या होत्या आणि त्यातही नसीम खान यांच्यासारखे मंत्री पदाचे दावेदार असलेले काँग्रेसचे नेते अगदी मनसेतून फुटून शिवसेनेत दाखल झालेल्या दिलीप लांडे यांच्यासमोर पराभूत झाले होते.
निकालांनंतर काँग्रेसला ज्याकाही जागा मिळाल्या त्या पारंपरिक मतदारांमुळे, आपापल्या मतदारसंघात स्वतःहून निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांच्या भरोसे आणि राष्ट्रवादीसोबत झालेल्या आघाडीमुळे असंच म्हणावं लागेल. मात्र निवडणूक निकालानंतर चार महत्वाच्या पक्षांमध्ये सर्वाधिक कमी जागा या काँग्रेसला मिळाल्या होत्या, तर भाजपसोबत युती होऊन देखील शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या जागांमध्ये जास्त फरक नसल्याचं समोर आलं. दुसरीकडे भाजपने एकूण १०५ जागांवर विजय प्राप्त केला होता आणि हा आकडा जवळपास शिवसेनेच्या दुप्पट होता. त्यामुळे भविष्यात भाजपसोबत राहणं म्हणजे स्वतःचं अस्तीत्व संपवून टाकणं याचा प्रत्यय शिवसेना नैतृत्वाला आला होता. शिवसेनेला दुसरी सर्वात मोठी भीती होती ती राष्ट्रवादीच्या भाजपसोबत जाण्याची आणि ते संकेत मिळताच शरद पवारांशी संपर्क साधला आणि पवारांच्या पाठीमागे घरंगळत जाण्यापलीकडे काँग्रेसकडे दुसरा पर्याय नव्हता.
अगदी झालं देखील तसंच, मात्र महाविकास आघाडी अस्तीत्वात येण्यापूर्वी पवारांनी राजकीय हेतू साधत शिवसेनेला एनडीए आणि केंद्र सरकार पासून भाजपसोबत संबंध तोडण्यास शिस्तबद्ध भाग पाडलं. भविष्यात शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाऊ शकणार नाही याची पवारांनी काळजी तर घेतली आहे, पण त्यासोबत अजित पवारांनी फडणवीसांसोबत घेतलेला शपथविधीतून शिवसेनेला मुठीत ठेवलं आहे. त्यात शिवसेनेत स्वतः उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त अजित पवार कोणाच्याही हाताखाली काम करणार नाहीत आणि शिवसेनेत तसा तुल्यबळ उमेदवार नसल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद घेण्यापलीकडे दुसरा मार्ग नव्हता. त्याचा दुसरा परिणाम असा झाला की, कोणताही प्रशासकीय अनुभव नसल्याने संपूर्ण राज्याची सत्ता अघोषीतपणे राष्ट्रवादीच्या हाती गेली आहे.
मात्र असं असलं तरी २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडी करण्याची अधिक शक्यता आहे आणि त्याप्रमाणेच या दोन्ही पक्षातील राजकीय नातेसंबंध अधिक घट्ट होताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी देखील आज राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास राज्यात चमत्कार घडेल असं म्हटलं आहे. कारण या दोन्ही पक्षांना झालेल्या एकूण मतदानाचा आकडा पाहिल्यास त्याचे संकेत मिळू शकतात आणि त्याच अनुषंगाने दोन्ही पक्ष रणनीती आखात आहेत.
कारण २०१९ मधील निवडणुकीत भाजपसोबत युती करताना भाजपच्या वाट्याला १५० जागा आल्या आणि त्यापैकी १०५ जागांवर भाजपने विजय प्राप्त केला. दुसरीकडे शिवसेनेने १२४ जागा लढवताना निम्म्याहून कमी म्हणजे केवळ ५६ जागांवर विजय मिळवला होता. त्यातून भाजप शिवसेनेला इतरांशी छुपी युती करून संपवत नाही ना असा संशय शिवसेनेत देखील बळावला होता.
आजच्या महाविकास आघाडीच्या खेळात शिवसेनेला राष्ट्रवादी त्यातुलनेत पूरक असली तरी भविष्यात थेट काँग्रेसला बाजूला सारून शिवसेना-राष्ट्रवादी इतर छोटे पक्ष ज्यामध्ये समाजवादी पक्ष तसेच आंबेडकरी विचारांचे गट एकत्र येतील अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषक आजही व्यक्त करतात. राष्ट्रवादीला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही ९२,१६,९११ असून मतांची टक्केवारी १६.७१ इतकी आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही ९०,४९,७८९ असून मतांची टक्केवारी १६.४१ इतकी आहे.
दुसरीकडे भाजपाला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही १,४१,९९,३८४ असून मतांची टक्केवारी २५.७५ इतकी आहे. भाजपाची हीच आकडेवारी शिवसेना सोबत नसल्याने मोठ्या प्रमाणात घटेल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. परिणामी २०२४ मध्ये स्वबळाचा नारा भाजपाला भोवण्याचीच चिन्ह अधिक आहेत. याचा अर्थ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकूण मंतांची आकडेवारीही १ कोटी ८३ लाखाच्या घरात जाते, जी भाजपाला मिळालेल्या एकूण मतांपेक्षा ३१ लाखाने अधिक आहे. उद्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसशी फारकत घेऊन शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र जरी आले तरी काँग्रेस-भाजप एकत्र येणे कदापि शक्य नाही. तर दुसरीकडे काँग्रेसने वंचितला सोबत घेतल्यास ती काँग्रेससाठी राजकीय आत्महत्या ठरेल. तर भाजपकडे मनसे व्यतिरिक्त कोणताही पर्याय नसेल. मात्र त्याची शक्यता देखील जवळपास अशक्य आहे. कारण उत्तरेकडील राज्यांमध्ये मनसेबद्दल कटुता असल्याने भाजप तसा निर्णय घेणार नाही.
एकूणच शिवसेनेच्या राजकीय संयमाचा विचार केल्यास पूर्वी भाजपसोबत युतीत सर्वकाही झेलून निवडणूक संपेपर्यंत स्वतःचा राजकीय हेतू साध्य केला आणि नंतर स्वतःच्या फायद्याचा विचार करून वेगळा निर्णय घेतला. तोच सय्यम आज शिवसेना काँग्रेससोबत दाखवत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांना वाटतं. मात्र वेळ येताच शिवसेना तिथेही स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून काँग्रेसला योग्य वेळ आल्यावर बाजूला करेल असं सध्याचं चित्र आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीची वाढणारी जवळीक भविष्यातील राजकारणाचे संकेत देताना दिसत आहे. राज्यातील एकूणच बदलत्या राजकारणाचा विचार केल्यास भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविल्यास आश्चर्य वाटणार नाही असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News English Title: NCP and Shivsena may contest future elections in alliance News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा