15 November 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

पवारांच्या खेळीने भाजपात गेलेल्या अनेक दिग्गजांची राजकारणात दांडी गुल होणार? - सविस्तर वृत्त

Sharad Pawar, Vijaysinha Mohite patil, Harshawardhan Patil, Krupashankar Singh, Ganesh Naik, Radhakrushna Vikhe Patil

मुंबई: भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांना संपवतो असा आरोप त्यांच्यावर नेहमीच करण्यात आला आहे. वास्तविक त्यात तथ्य असलं तरी सत्तेतील सहकारी पक्षातील नेते आणि त्यांच्या पक्षाला देखील भाजपने राज्यात अप्रत्यक्षरीत्या स्वतःच्या पक्षाला विसरून भाजपचे अघोषित प्रवक्ते होण्यास भाग पाडलं होतं. महादेव जाणकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अप्रत्यक्षरीत्या का होईना, स्वतःचे पक्ष विसरून भाजपाच्यामागे फरफटत गेले आणि आज त्यांच्या कार्यकर्त्यांना भविष्य आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोडचिट्ठी देणारे दिग्गज नेते देखील पवारांच्या राजकीय खेळीने काय करावे आणि काय करू नये या विचाराने पछाडले असणार यात वाद नाही.

काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले राधाकृष्ण विखे पाटील हे देखील चिंतेत आहेत. जर देवेंद्र फडणवीस बाजूला पडले तर भारतीय जनता पक्षात त्यांना कुणी ओळखणार देखील नाही, अशी त्यांची अवस्था होणार आहे.

त्यानंतर सर्वात मोठे संकट कोसळले आहे नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या कुटुंबावर. नाईक यांचे संपूर्ण कुटुंब नवी मुंबई महानगर पालिकेती नगरसेवकांसह भाजत गेले आहेत. ही निवडणूक जिंकल्यानंतर आपल्याला मलईदार मंत्रिपद मिळेल असा गणेश नाईक यांना विश्वास होता. परंतु, बदललेल्या परिस्थितीनंतर त्यांचे काय होणार, हा प्रश्न त्यांना पडला आहे.

निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आपल्याला मंत्रिपद मिळेल याच आशेने त्यांनी बरोबर निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. परंतु, हर्षवर्धन पाटील हे इंदापूर मतदारसंघातून निवडणूक हारले असून भारतीय जनता पक्ष त्यांना विधान परिषदेवर देखील पाठवू शकणार नाही, अशी स्थिती आहे. परंतु, ते काँग्रेसमध्येच राहिले असते, तर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी असती हे नक्की.

मुंबईतील उत्तर भारतीयांचे काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह याचीही स्थिती अशीच आहे. त्यांनी कलम ३७० च्या मुद्याचा आधारे काँग्रेसवर टीका करत भारतीय जनता पक्षात गेले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षांच्या उमेदवारांच्या विजयासाठी कंबर कसली. मात्र आता ते काँग्रेसमध्ये असते तर निदान आमदार तरी झाले असते असे त्यांना वाटत आहे. केवळ कृपाशंकर सिंहच नाही, तर भारतीय जनता पक्षात गेलेले मुंबईतील राजहंस सिंह, चित्रसेन सिंह, रमेशसिंह ठाकूर, जयप्रकाश सिंह हे नेते देखील आता चिंतेत आहेत. आता फडणवीस हेच जर मुख्यमंत्रिपदी नसतील, तर मग या सर्वांना दिलेली आश्वासने पाळणार कोण?

शरद पवार यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे अकलूजचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विधानसभेनंतर आपले पुनर्वसन होईल असे वाटत होते. एक तर मोहिते पाटील कुटुंबाला ना लोकसभेची उमेदवारी मिळाली, ना विधानसभेची. आता तर त्यांना विधानपरिषद मिळण्याचाही विश्वास राहिलेला नाही. मंत्रिपद तर दूरच राहिले. याबरोबरच त्यांचेस शरद पवार यांच्याशी असलेले संबंधही बिघडले गेले आहेत.

दुसरीकडे काही पक्षाच्या प्रमुखांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास महादेव जाणकार आणि सदाभाऊ खोत हे राज्य मंत्रिमंडळात होते, तर रामदास आठवले हे केंद्रात मंत्रीपदी आहेत. त्यात कोणतीही राजकीय शक्ती नसलेले विनायक मेटे यांना खुश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचं अध्यक्ष पद आणि शासनाच्या खचातून २० लाखाची गाडी बहाल करण्यात आली होती. वास्तविक या सर्व नेत्यांना त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वात नसलेली ताकद आणि त्याची जाणीव त्यांना नसणार असा विषय नसून, स्वतःचे स्वार्थ साधून त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांचे भविष्य भाजपच्या दावणीला लावल आहे. मागील सरकारच्या कार्यकाळात विकासाच्या कामगिरीवर या नेत्यांबद्दल न बोललेलंच बरं.

भाजपने या चारही पक्षातील प्रमुखांना सत्तेत खुश करून त्यांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे वापरलं. त्यात पक्ष वेगळे असले तरी त्यांना निवडणूक देखील भाजपच्या कोट्यातून आणि चिन्हांवर लढवावी लागली. मध्यंतरी या चारही नेत्यांनी एकत्र येऊन भाजपवर दबाव टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि त्यानिमित्ताने एका हॉटेलमध्ये बैठक देखील बोलावली, मात्र भाजपने त्याकडे ढुंकूनही पहिले नाही आणि हे नेते पुन्हा शांत झाले. आमचा पक्ष आहे हे दाखवण्यासाठी, दरवर्षी केवळ पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्यापलीकडे त्यांच्या हातात सध्या काहीच नाही. अनेक वेळा विधासनसभा निवडणुकीच्या तोंडावर १०-१५ जागांची मागणी केली जाते, मात्र इथे शिवसेनेची डाळ शिजत नव्हती तिथे या पक्षांना कोण विचारणार अशी अवस्था होती. त्यामुळे पक्ष वेगळे असले तरी त्यांच्या अध्यक्षांना भाजपच्या तालावर नाचण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, पण कार्यकर्त्यांचं काय? उद्या ते दुसरा पक्ष निवडतील असंच काहीस साध्याच राजकरण आहे.

दरम्यान, रासपला निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यासाठी अधिक जागांवर लढण्याबरोबर पक्षाच्या चिन्हावर लढणे आवश्यक होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमचे उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या चिन्हावर लढणार नाहीत तर रासपच्या चिन्हावर लढतील, असे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष व पशुपालन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पक्षाच्या मेळाव्यात जाहीर केले होते. मात्र दौंड विधानसभा मतदारसंघामधील राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार आमदार राहुल कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल आणि ते निवडून देखील आहे, मात्र भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर आणि त्यामुळे आताच्या राजकीय परिस्थतीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला तोदेखील जोरदार राजकीय धक्का मानला जातो. कारण महायुतीमध्ये रासपच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवार हे कमळ या चिन्हावर नव्हे तर रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी भूमिका महादेव जानकर यांनी घेतली होती, पण तसे झाले नाही.

मात्र केवळ भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची स्तुती करत मंत्रिमंडळात टिकून राहणं एवढाच कार्यक्रम या नेत्यांना केला. मात्र आता भाजपने सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय घेतल्याने या नेत्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे राजकीय भवितव्य अधांतरी असल्याचं सध्यातरी दिसत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवणं किती गरजेचं असतं हे जरी या नेत्यांना भविष्याचा विचार करून समजल्यास बरं होईल असं अनेकांनी म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x