फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला झालेला महारोग असं मी म्हणणार नाही- अनिल गोटे
धुळे, २६ जून : भाजपचे आमदार गोपीचंद पडाळकर यांनी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केल्याने सर्वत्र रोष पसरत आहे. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही उडी मारली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझाय विश्वासघात केला, पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे, असे म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी मी असे बोलणार नाही, असं ते म्हणाले. गोटे यांनी एक जाहीर पत्रक काढून थेट नामोल्लेख करत फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
‘फडणवीसांनी माझ्याशी केलेली धोकेबाजी, विश्वासघात जगजाहीर आहे. पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस ”महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे” असे म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी मी तसे कधी बोलणार नाही. फडणवीस रोज रात्री १० नंतर वर्षा बंगल्यावर सार्वजनिक किंमत नसलेल्या चरित्रहीन लोकांना घेऊन बसायचे. आपल्याच पक्षातील नेत्यांविरुद्ध ते कारस्थानं करायचे. हे काही सुसंस्कृतपणाचे, सभ्यतेचे, मनाच्या दिलदारपणाचे लक्षण नाही’, अशा शब्दांत टोपे यांनी फडणवीसांना लक्ष्य केले. ‘एकही धनगर विधानसभेत निवडून येऊ नये यासाठी त्यांनी कारस्थाने केली. प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे उद्योग केले. हे सारे मी जाणून आहे. माझ्या मतदारसंघात तर ‘मुसलमान निवडून आली तरी चालेल पण अनिल गोटे निवडून येता नये’, यासाठी फडणवीसांनी पैशांचा महापूर आणला होता, असा आरोप गोटे यांनी केला.
अनिल गोटे यांनी एक पत्रक जारी केलं असून पडळकरांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. pic.twitter.com/fmLIxOaPYU
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) June 26, 2020
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील कुणीही राजकारणात राहू नये, अशी हलकट, नीच आणि संकुचित बुद्धी फडणवीसांचीच असू शकते असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. “कुत्सीत विचारांच्या, हलकट मनोवृत्तीचे, लबाडी व खोटे बोलण्याचे एकत्रित रुप म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. ते हलक्या कानाचे कारस्थानी आहेत की, शकुनी मामा देखील झक मारेल. प्रारंभीच्या काळात एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध कारस्थान यांनीच रचले. खडसे दाऊदच्या बायकोसोबत फोनवर बोलतात इथपासून सुरु झालेले आरोप त्यांच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचले. नाथाभाऊंची चूक एवढीच की त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती,” असंही ते म्हणाले आहेत.
पडळककरांच्या टीकेवर बोलताना अनिल गोटे यांनी म्हटलं आहे की, “पडळकरांचा राजकारणातील अनुभव फारच तोकडा आहे. पडळकरांनी शरद पवारांना करोनाची उपमा दिली यावरुन त्यांची राजकीय पात्रता, मनाच क्षुद्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते. पवारांचे वय, अनुभव अन् राजकीय कारकिर्दीसमोर पडळकर डासाएवढेही नाहीत. डास मारायला कोणी बंदूक वापरणार नाही. एक हीटचा फवारा भरपूर असतो”.
पडळकरांना भाजपाच्या धोकेबाजीचा झटका बसेल तेव्हाच शुद्धीवर येतील असंही ते म्हणाले आहेत. “पडळकर नव्या नवरीचा आनंद उपभोगत आहे. नवरी रुळल्यावर त्यांना झटके बसतील त्यावेळेला बाजूला स्वत:ची सावलीसुद्धा उभी राहणार नाही. माझ्या अनुभवाच्या जोरावर मी सांगतो आहे,” असं ते म्हणाले आहेत.
News English Summary: Devendra Fadnavis betrayed me, but out of anger, I will never say that Fadnavis is a leper in the politics of Maharashtra. “Despite the facts, I will not say that,” former MLA Anil Gote said.
News English Title: NCP Former MLA Anil Gote Controversial Statement On BJP Devendra Fadanvis News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL