13 January 2025 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | महिलांनो 2 वर्षांत 2 लाख रुपये मिळवायचे असतील तर 'या' योजनेत पैसे गुंतवा, मजबूत फायदा होईल Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर 45 टक्क्यांनी घसरला, आता तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: RVNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Penny Stocks | 82 पैशाच्या पेनी शेअरने होतेय मल्टिबॅगर कमाई, यापूर्वी दिला 720% परतावा, डिटेल्स नोट करा - Penny Stocks 2025 IPO GMP | पैसे तयार ठेवा, 4 नवीन IPO लाँच होत आहेत, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड जाणून घ्या - IPO Watch IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
x

राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली

Raj Thackeray, NCP MLA Atul Benke, MNS, Junnar, Former MLA Sharad Sonawane, Shivsena Asha Buchke

मुंबई: सध्या राज्यात विधानसभा राज्यात निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला असला तरी अजून सत्ता स्थापनेवरुन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये एकमेकांविरुद्ध कुरघोडीचे राजकारण सुरुच आहे. दुसरीकडे एक आमदार निवडून आल्यानंतर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एनसीपी’मधील राजकीय जवळीक अजून वाढताना दिसत आहे.

दरम्यान, काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक येथे सदिच्छा भेट घेतली होती. आज एनसीपीच्या आमदाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर येथे सदिच्छा भेट घेतली.

जुन्नरमधून निवडून आलेले णिसपीचे आमदार अतुल बेनके यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. जुन्नर येथून २०१४ साली शिवसेनेने तिकीट नाकारतात आयत्यावेळी मनसेत प्रवेश करून शरद सोनावणे जुन्नर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे निवडून आले होते. मात्र निवडणुकीच्या काही महिने आधी ते पुन्हा शिवसेनेत परतले आणि सोनावणे यंदा जून्नरमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत होते. मात्र एनसीपीचे उमेदवार अतुल बेनके यांनी शरद सोनावणेंचा पराभव केला.

जून्नरमधून शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने आशा बुचके यांच्या बंडखोरीचा शिवसेनेला फटका बसला आणि शरद सोनावणे पराभूत झाले. आशा बुचके यांनी अपक्ष निवडणूक लढवत ५० हजारपेक्षा जास्त मते घेतली व शरद सोनावणे यांचा मार्ग बिकट केला. राष्ट्रवादीच्या अतुल बेनके यांना ७४ हजार, शरद सोनावणे यांना ६५ तर आशा बुचके यांना ५० हजार मते मिळाली. याच मतदारसंघात मनसेने उमेदवार न देता, राष्ट्रवादीला पाठिंबा देत मनसेची ताकद अतुल बेनके यांच्यापाठीशी उभी केली होती आणि त्यामुळेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार अतुल बेनके यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवास्थानी सदीच्छा भेट घेतली.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x