5 November 2024 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

भगवान गडावर पोहोचले मंत्री धनंजय मुंडे; पंकजा मुंडेंना टोला

Bhagwangad, Minister Dhananjay Munde, Pankaja Munde

बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आज भगवानगडावर जाणार आहेत. मंत्री झाल्यानंतर मुंडे पहिल्यांदाच भगवान गडावर जातील. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना मंत्री झाल्यावर भगवानगडावर दर्शनासाठी बोलावलं होतं. आज ते नारायणगड, भगवानगड आणि गहिनीनाथगडावर जाऊन महंतांचे आशीर्वाद घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही गडावर धनंजय मुंडे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे पदभार स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदाच भगवानगडावर आले. नगद नारायण गड, भगवान गड गहिनीनाथ गड व जिल्ह्यातील इतर कोणत्याही गडावर इथून पुढे राजकारण होणार नाही, होवू दिलं जाणार नाही. असा टोला त्यांनी लगावला. शक्ती पिठाचे दर्शन घेवून विकासाला सुरुवात करणा, मी उतणार नाही, मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो असं सांगत त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना टोला लगावला. ते म्हणाले, विकासाचा हा शब्द देत धनंजय मुंडेनी नव्या इनिंग ला सुरुवात केली.

आम्हाला कोणालाही वाटले नव्हते की मी मंत्री होईन. मात्र आता मंत्री झालोय. त्यामुळे सर्वाधिक विकास बीड जिल्ह्याचा करायचा आहे. मी आज नारायणगडावर आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आशीर्वाद घेण्यापूर्वी रात्रीतून पालकमंत्रिपदाची घोषणाही झाली. आता कोणत्याही गडावरुन कसलंच राजकारण नाही, तर विकास होईल, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

 

Web Title:  NCP leader and Minister Dhananjay Munde to visit Bhagwangad today.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x