21 April 2025 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | वेगाने धावणार टाटा मोटर्स शेअर्स, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS GTL Share Price | या बातमीचा जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकवर परिणाम होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: GTLINFRA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा चिल्लर प्राईस पेनी स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 627% परतावा दिला - NSE: RTNPOWER IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

तेव्हा कांद्याचे भाव वाढल्याने भाजपवाले गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले होते: शरद पवार

NCP, Sharad Pawar, Onion Producers, Onion Producers

नांदेड: विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. नांदेडमध्ये शरद पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.याच पार्श्वभूमीवर यावेळी शरद पवार म्हणाले, ‘आमच्या काळात जगात सर्वाधिक कृषी मालाची निर्यात करणारा देश भारत झाला होता. मी कृषीमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले म्हणून भाजपवाले गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले होते. भाव वाढले म्हणजे शेतकऱ्याला फायदा होतो, म्हणून यांना पोटशूळ उठला होता, असे यावेळी शरद पवार म्हणाले.

तसेच पुढे बोलताना पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावेळी पवार म्हणाले, दिल्ली यांची, मुंबई पण यांची अन् सर्वाधिक टीका मात्र माझ्यावर करतात, असे पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना स्वप्नातही मीच दिसतो, ते सातत्याने शरद पवार-शरद पवार घोकत असतात असे देखील पवार म्हणतात. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, लाखाचा पोशिंदा संकटात आहे. 65% लोक शेती करतात पण कर्जबाजारी झाले आहेत. यंदा 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रिजर्व्ह बँकेने 3 आठवड्यापूर्वी आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगितलं आहे, असे यावेळी पवार म्हणाले.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी “शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगावं,” असा सवाल उपस्थित केला होता. शाह यांच्या प्रश्नाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर प्रतित्युत्तर दिले. विशेष म्हणजे किल्लारीचा भूकंप आणि राज्यकर्त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देत पवारांनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.

कोल्हापुरात पुराचे संकट उद्भभवले. तिथे गावा-गावांत जाण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवाई सफर करून आले. लातूरला भूकंप झाला, त्यादिवशी गणेश विसर्जन होते. पहाटे ४ वाजता खिडकीचे तावदाने वाजली. मला शंका आली, हा भूकंप तर नसेल? मी कोयनेतील भूकंपमापन केंद्रावर संपर्क केला. किल्लारीत भूकंप झाल्याचे कळले. क्षणाचाही विलंब न लावता लातूर निघालो. पहाटे ६ वाजता मुंबई विमानतळावर होतो. सव्वासात वाजता किल्लारीत पोहचलो. परिस्थती भयंकर होती. १५ दिवस थळ ठोकून थांबलो. ही राज्यकर्त्याची जबाबदारी आहे. अन् आता सत्ताधारी मला विचारतात, शरद पवारांनी काय केलं?,” अशा शब्दांत पवार यांनी अमित शाह यांच्या प्रश्नाचा समाचार घेतला.

पुढे बोलताना पवार म्हणाले, “मुख्यमंत्री पाच वर्षात काय केलं हे सांगायला जातात. काय केलं हे पाच मिनिटांत सांगतात नंतर सगळ भाषण माझ्यावर करतात. मी चौदावेळ निवडून आलो. आता या निवडणुकीत रस नाही. पण, हा महाराष्ट्र कर्तृत्वान तरुण पिढीच्या हातात द्यायचा आहे. दुसरीकडे सत्ताधारी नुसते शरद पवार… शरद पवार करतात अगदी झोपेतसुद्धा,” असा टोला पवारांनी लगावला.

‘आमच्या काळात जगात सर्वाधिक कृषी मालाची निर्यात करणारा देश भारत झाला होता. मी कृषीमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले म्हणून भाजपवाले गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले होते. भाव वाढले म्हणजे शेतकऱ्याला फायदा होतो, म्हणून यांना पोटशूळ उठला होता,’ असं म्हणत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘दिल्ली यांची, मुंबई पण यांची अन् सर्वाधिक टीका मात्र माझ्यावर करतात’

लाखाचा पोशिंदा संकटात आहे. 65% लोक शेती करतात पण कर्जबाजारी झाले आहेत. यंदा 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रिजर्व्ह बँकेने 3 आठवड्यापूर्वी आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगितलं आहे. दिल्लीपासून सगळीकडे यांची सत्ता आहे, मात्र ते माझ्यावर टीका करतात, असा पलटवार शरद पवार यांनी केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या