लोटसचं ऑपरेशन | भाजप आमदाराच्या पोश्टरवर खडसे | लवकरच राष्ट्रवादीत?

जळगाव, ११ डिसेंबर: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात भारतीय जनता पक्षाला राजकीय हादरे देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जळगावात विस्तार करण्याचं वचन त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी दिलं होतं. भारतीय जनता पक्षाचा एकही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही असं म्हणणाऱ्या भाजपच्या संकट मोचकांना म्हणजे गिरीश महाजनांना मोठा धक्का दिला होता. कारण जिल्ह्यातील एक-दोन नव्हे तर तब्बल 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता.
दरम्यान या प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी आता मी भारतीय जनता पक्षाला माजी राजकीय ताकद दाखवून देतो. आता आणि भविष्यात उत्तर महाराष्ट्रात केवळ एनसीपीच असेल, अशी राजकीय गर्जनाच एकनाथ खडसे यांनी केली होती. जळगावमधील भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाच्या एकूण कार्यपद्धती तसेच एकाधिकारशाहीवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे हे नाराज कार्यकर्ते लवकरच एनसीपीमध्ये जाहीर प्रवेश करतील,” अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यामुळे भविष्यात उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसेंच्या य पक्षप्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे बदलण्याचा अंदाज वर्तवला जात असतानांच भुसावळचे भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या फलकावर एकनाथ खडसे यांचा फोटो झळकल्याने आमदार सावकारे देखील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
आमदार संजय सावकारेंचा आज शुक्रवारी वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून भुसावळ शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावरुन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची छायाचित्रे वगळण्यात आली आहेत. समाज माध्यमांवरील अनेक जाहिरातींमध्ये सावकारेंसोबत एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे यांची छायाचित्रे आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसह गिरीश महाजन यांचेही छायाचित्र जाहिरातींमधून वगळण्यात आले आहे. काही फलकाववर भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांचे छायाचित्र आहे. त्यामुळे सावकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.
News English Summary: BJP Bhusawal MLA Sanjay Saavkare’s birthday is being celebrated on Friday. Pictures of BJP leaders have been removed from billboards erected by his supporters in Bhusawal on the occasion of his birthday. Many advertisements on social media have pictures of Eknath Khadse and MP Raksha Khadse with moneylenders. Pictures of BJP leaders and Girish Mahajan have also been dropped from advertisements. Some of the billboards have pictures of Bharatiya Janata Party district president and Jalgaon city MLA Suresh Bhole. Therefore, there is talk that the moneylenders are on the path of NCP.
News English Title: NCP Leader Eknath Khadse photo on BJP MLA Sanjay Savkare poster News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल