23 November 2024 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

मी सुद्धा विरोधी पक्षनेता होतो, पण फडणवीसांसारखा कुत्र्या-मांजराचा खेळ खेळलो नाही - खडसे

NCP leader Eknath Khadse

जळगाव, १८ एप्रिल: राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या सर्वात जास्त सक्रीय रुग्ण आढळून येत आहे. नवीन सक्रीय रुग्ण येण्याच्या बाबतीत राज्य सध्या देशात पहिल्या नंबरवर आहे. महाराष्ट्र राज्यात जानेवारी ते मार्च महिन्यातील 361 सक्रीय रुग्णांचे सॅम्पल घेण्यात आले. दरम्यान, त्यामध्ये जीनोम सीक्वेंसिंग केले असता 220 नमुन्यात डबल म्यूटेशन व्हायरस आढळले होते. हे व्हायरस आता राज्यातील अमरावती, अकोला, पुणे, नागपूर, वर्धा, ठाणे, औरंगाबाद आदी जिल्हात आढळून आले आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.

दरम्यान, रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून सध्या राजकारण चांगलेचं चर्चेत आहे.महाराष्ट्रासोबत केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. यावरूनचं राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना चांगलेच सुनावले आहे.

महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी संकट आले अथवा आकस्मिक संकटाचा प्रसंग उद्भवला, मग तो किल्लारीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत, अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केले आहे. विरोधी पक्षनेता म्हणूनही मी सुद्धा काम केले आहे. पण, संकटाच्या काळात असा कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळला नाही.

देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही. फडणवीस हे सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडेल अशा वल्गना करतात. आपले कार्यकर्ते टिकून राहावेत म्हणून फडणवीस हा आटापिटा करत आहेत. मला वाटले फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. त्यांनी आतापर्यंत ४-५ वेळा सरकार पडणार म्हणून सांगितले. आता त्यांनी पुन्हा २ तारीख दिली आहे. मी २ तारखेची वाट पाहतो आहे. जर २ तारखेला सरकार पडले नाही, तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे असे मी समजेन, असा टोला खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

 

News English Summary: Politics is currently in the spotlight due to the supply of remedivir injection. The Center has been accused of discriminating against Maharashtra. Eknath Khadse, who joined the NCP from this, has told Fadnavis well.

News English Title: NCP leader Eknath Khadse slams Devendra Fadnavis over politics during corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x