20 April 2025 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ | सरकार स्थापन करायला तळमळत आहेत - खडसेंची टीका

NCP leader Eknath Khadse

मुंबई, ०७ जून | राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावली आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही कोपरखळी लगावली आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे, असा चिमटा खडसे यांनी काढला.

महाविकास आघाडी सरकार जन्माला आल्यापासून हे सरकार पडणार असल्याचं चंद्रकांत पाटील सांगत आहेत. सरकार पडणार असल्याच्या चंद्रकांतदादांनी दोन तारखाही दिल्या. फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती. पण काही होत नाही. सरकार काही जात नाही. विरोधक वाट बघत आहेत. ते वाटच बघत राहतील, असा टोला त्यांनी लगावला. खरं सांगायचं तर राज्यातील आघाडी सरकार दिवसे न् दिवस मजबूत होत आहे.

 

News English Summary: Devendra Fadnavis has been uneasy since he came to power. NCP leader Eknath Khadse has told Fadnavis that he is still struggling to establish power.

News English Title: NCP leader Eknath Khadse taunt Devendra Fadnavis over government forming with Ajit Pawar news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या