30 December 2024 10:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका Business Idea | गृहिणींसाठी कमी गुंतवणूक आणि जास्त नफा असलेले टॉप 4 व्यवसाय, आजपासूनच सुरुवात करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATAPOWER NTPC Share Price | NTPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: APOLLO
x

अरे? पेट्रोल पण पोहचले की 105, बहुधा आता तिथंच थांबेल ते ही | रोहिणी खडसेंचं खोचक ट्विट

NCP Leader Rohini Khadse

मुक्ताईनगर, ०३ जुलै | इंधनाचे दर सातत्याने वाढतच असल्याने त्याचा परिणाम थैट दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंच्या किंमतींवरही होताना दिसत आहे. पेट्रोलने शंभरील पार केल्यानंतर देशभरातून मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. मात्र, आता पेट्रोलने चक्क १०५ चा आकडा गाठला आहे. त्यावरुन, रोहिणी खडसेंनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

दिल्लीत आज पेट्रोल ९९.१६ रुपयांवर पोहोचले आहे. तर, दिल्लीत डिझेल ८९.१८ रुपये प्रती लीटर विकले जात आहे. तुलनेनं मुंबईत पेट्रोलचे दर १०५ रुपयांवर पोहोचले आहेत. भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत १०५ विजयी आमदारांचे संख्याबळ गाठले होते. राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला होता. मात्र, महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर राहावे लागले.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी पेट्रोल दरवाढीवरुन भाजपला खोचक टोला लगावला आहे. अरे पेट्रोल पण पोहोचले की 105, बहुधा आता तिथंच थांबेल ते.. असे ट्विट रोहिणी खडसे यांनी केले आहे. भाजप आमदारांच्या संख्याबळाएवढा पेट्रोलचा प्रति लिटरचा दर आहे, त्यावरुन रोहिणी खडसेंनी भाजपला टोला लगावला आहे. दरम्यान, रोहिणी खडसे नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपवर टीका करतात. यापूर्वीही ओबीसी आंदोलनावरुन त्यांनी भाजपवर टीका केली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP leader Rohini Khadse tweet on petrol price stop on 105 news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x