15 November 2024 2:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL
x

पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्यांना भविष्यात कुणी किंमत दिली नाही - रुपाली चाकणकर

NCP leader Rupali Chakankar, Amruta Fadnavis, Temple reopen

मुंबई, १४ ऑक्टोबर : आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी याची घोषणा केली. मेट्रो कारशेड स्थलांतरित करण्याच्या निर्णयावरून भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

भाजप नेते “आरेमधील कारशेड कांजूरमार्गला हलवणं म्हणजे बाल हट्ट पुरवण्याचा प्रकार आहे,” असं म्हणत भाजपा नेते प्रसाद लाड यांनी अप्रत्यक्षरीत्या आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. दरम्यान, मेट्रो कारशेड स्थलांतरित करण्याच्या निर्णयावरून भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पोलिसांची बँक खाती ॲक्सिस बँकेत वळवल्याचा हवाला देत भाजप नेत्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

“आ. प्रसाद लाड म्हणाले, आरेमधील कारशेड कांजूरमार्गला हलवणे म्हणजे बाल हट्ट पुरवण्याचा प्रकार आहे, असं मी ऐकलंय.. मग प्रश्न असा आहे की, मागील सरकारच्या काळात पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी ॲक्सिस बँकेमध्ये वळवली त्याला कोणता हट्ट म्हणायचा??,” असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत उत्तर दिलं आहे.

त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्वीट करताना अशी टीका केली होती की, ‘महाराष्ट्रात बार किंवा दारूची दुकाने उघडण्याची मुभा आहे पण मंदिर धोकादायक झोनमध्ये आहे. पण काही जण नियमावली लागू करण्यासही जेव्हा असमर्थ ठरतात तेव्हा त्यांना प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी ‘प्रमाणपत्राची’ गरज असते.’ याच वेळी अमृता फडणवीस यांनी ‘Dicey Creature’हा शब्द देखील ट्विटमध्ये वापरला आहे.

पाहा रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या:
‘राघोबादादा पेशवेच्या गादीला आणि समस्त पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्या ‘Dicey Creature’ ला भविष्यात कुणी किंमत दिली नाही. त्यामुळे आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा.’

 

News English Summary: NCP leader Rupali Chakankar has replied. Amrita Fadnavis had tweeted, “Maharashtra is allowed to open bars or liquor shops but the temple is in a dangerous zone.” But even when some are unable to enforce the rules, they need a ‘certificate’ to prove their sincerity. At the same time, Amrita Fadnavis has also used the word ‘Dicey Creature’ in her tweet.

News English Title: NCP leader Rupali Chakankar slams Amruta Fadnavis over temple reopen politics news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x