27 December 2024 10:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा IPO Watch | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह तपशील जाणून घ्या - IPO GMP HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC
x

ना खाऊँगा ना खाने दूँगा, गैस सिलेंडर इतना मेहंगा कर दूँगा, की पकाने भी नहीं दूँगा - रुपाली चाकणकर

NCP leader Rupali Chakankar

मुंबई, ०२ जुलै | मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील सामान्य जनता महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीमुळे प्रचंड त्रस्त आहे. विशेष म्हणजे मोदी सरकार यावर कोणत्याही उपाययोजना देखील करताना दिसत नसल्याने सामान्यांचं जगणं कठीण होऊ बसलं आहे.

कारण आता सरकारी इंधन कंपन्यांनी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या दरात २५.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत स्वयंपाकाच्या गॅसच्या एका सिलिंडरसाठी ८३४.५० रुपयांना मिळेल. आतापर्यंत हा सिलिंडर ८०९ रुपयांना मिळत होता. देशाच्या इतर भागांमध्येही सिलिंडरचे दर वाढले आहेत.

याआधी १ मे रोजी गॅस कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. एप्रिलमध्ये सिलिंडरच्या दरात १० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्याआधी फेब्रुवारी, मार्चमध्ये सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. मुंबईत गेल्या महिन्यात ८०९ रुपयांना मिळणारा १४.२ किलोचा सिलिंडर आता ८३४.५० रुपयांना मिळेल. कोलकात्यात याच सिलिंडरसाठी ८६१ रुपये मोजावे लागतील. आधी याच सिलिंडरची किंमत ८३५.५० रुपये इतकी होती. चेन्नईत आधी ८२५ रुपयांना मिळणारा सिलिंडर ८५०.५० रुपयांना मिळेल.

याच विषयाला अनुसरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्याच्याच गर्जनेवरून जोरदार टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय की, “ना खाऊँगा ना खाने दूँगा’, गैस सिलेंडर इतना मेहंगा कर दूँगा, की पकाने भी नहीं दूँगा’

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP leader Rupali Chakankar slams Modi Govt over hike in Gas cylinder price news updates.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x