VIDEO | आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं - रुपाली चाकणकर
पुणे, ०८ जून | सतत चर्चेत असणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांना मोठा धक्का बसला आहे. नवनीत राणा कौर यांचे मुंबई हायकोर्टाने सादर केलेले जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. हायकोर्टाने नवनीत राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र खोटे ठरवल्याने त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधत अमरावतीची जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही असं म्हटलं आहे.
रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरती एक व्हिडिओ शेअर करत नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, चाकणकर यांनी म्हटलं आहे की, अमरावती मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. परंतु नवनीत राणा यांनी खोटी जातीचे प्रमणपत्र देऊन ही निवडणूक जिंकली. परंतु आज उच्च न्यायालयाने आपला दाखला दिलेला आहे की, नवनीत राणा यांनी जातीची प्रमाणपत्रे खोटी सादर केलेली आहेत. नवनीत राणा रील लाईफ आणि रियल लाइफमध्ये खूप मोठा फरक आहे. असं देखील चाकणकर म्हणाल्या.
नवनीत राणा यांच्या मध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं. pic.twitter.com/9sebS16kX4
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 8, 2021
दरम्यान, पुढे बोलताना चाकणकर म्हणाल्या की, अभिनय क्षेत्रात एखादा सिन तुम्हाला रिटेक वर रिटेक करून तो सीन तुम्हाला परफेक्ट करता येईलही, मात्र अमरावतीची जनता तुम्हाला पुन्हा रिटेकची संधी देणार नाही. कारण आपण अमरावतीच्या लाखो जनतेचा अपमान तर केलाच आहे. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचा देखील अपमान केला आहे. जर थोडी जर नैतिकता शिल्लक असेल तर आपण राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात आपल नशीब आजमावून पहावे. असं चाकणकर म्हणाल्या.
News English Summary: Amravati MP Navneet Rana Kaur, who is in constant discussion, has been shocked. Navneet Rana Kaur’s caste certificate submitted by Mumbai High Court has been canceled. Navneet Rana’s caste certificate has been found to be false by the High Court. NCP state president Rupali Chakankar has targeted Navneet Rana and said that the people of Amravati will not give you a chance to retake.
News English Title: NCP leader Rupali Chakankar slams MP Navneet Kaur Rana after Mumbai High court decision on caste certificate news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम