23 February 2025 12:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

Bhima Koregaon Riots, NCP MLA Dhananjay Munde, Chief Minister Uddhav Thackeray

मुंबई: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र (NCP MLA Dhananjay Munde wrote a letter to Chief Minister Uddhav Thackeray) लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे (Bhima Koregaon Riots).

दरम्यान, भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील (Indu Mill and Bhima Koregaon) आंबेडकरी कार्यकर्ते व युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी तसेच मुंबईतील दादर येथील इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासंदर्भात लाखोंच्या संख्येने आंबेडकरी समाज जमला होता. मात्र मानवंदना देऊन घरी परतणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवर अमानुष हल्ला केला गेला, दगडफेक करण्यात आली होती. समाजकंटकांनी योजनाबद्धरीतीने अनेक गाड्यांची तोडफोड केली व जाळपोळ केली. या हल्ल्यात अनेक बांधव जखमी झाले होते. या प्रकारामुळे दलित समाज अस्वस्थ झाला होता.

दरम्यान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिकेने जय्यत तयारी राज्यभर सुरु आहे. त्यामुळे भीमा कोरेगांव घटनेतील सर्व व्यक्तींवरील गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव ठाकरे सरकारवर वाढताना दिसत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x