23 February 2025 2:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

NCP Minister Dhananjay Munde, Corona Positive, News Latest Updates

मुंबई, १२ जून : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांचे दोन स्वीय सहाय्यक आणि गाडी चालकाला देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते. या अगोदर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन देखील केले होते. आता मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

धनंजय मुंडे हे मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आले होते. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच बीड जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा अनेक बैठकांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविलेला होता. विशेष म्हणजे १० जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमास धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते.

मुंबईत मंत्रालयासमोर असलेल्या मंत्र्यांच्या बंगला परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या बंगला परिसरातील कर्मचारी वस्ती असलेल्या भागातही कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये मुंडेंच्या स्वयंपाकी, मदतनीस यांचा समावेश आहे. तसेच ५ जूनला परळीतील एक महिला औरंगाबाद येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. या महिलेच्या कुटुंबीयांच्या संपर्कात धनंजय मुंडे हे आलेले होते. गेल्या आठवड्यातच अंबाजोगाई येथील कोरोना चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटनही धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झालेले होते. त्यामुळे त्यांना नेमकी कुठे कोरोनाची लागण झाली, याचा उलगडा होऊ शकलेला नाही. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

News English Summary: NCP leader and social justice minister Dhananjay Munde has contracted corona. Dhananjay Munde’s two personal assistants and the driver have also been found to have corona. Dhananjay Munde was present at the meeting of the Board of Ministers on Wednesday.

News English Title: NCP Minister Dhananjay Munde Corona Positive News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x