20 April 2025 3:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा
x

वारकऱ्यांनो सावधान | श्री विठ्ठल महापूजेला विरोध करणारे ते RSS'चे चमचे आहेत - आ. मिटकरी

NCP MLA Amol Mitkari, BJP Varkari, Shree Vitthal Mahapuja

मुंबई, २२ नोव्हेंबर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठलाची महापूजा पार पडणार आहे आहे. मात्र या पूजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे आहेत असं राष्ट्रवादीचे विधान परिषदेचेआमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे. “तुका म्हणे खळ! करु समयी निर्मळ” असं देखील त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महापूजेला विरोध करणारे वारकरी नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चमचे आहेत. वारकऱ्यांच्या नावाखाली पूजेला विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कंपनीपासून वारकऱ्यांनी सावध रहावे अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. काल त्यांनी एक ट्विट करत त्यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.

यंदा कार्तिकीच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. आषाढीच्या वेळीही वारीचे स्वरुप हे मर्यादित होते. आता कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे दिंड्या दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र देवस्थानात करण्यात येणारे नित्योपचार मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठीचे आखून दिलेले नियम आहेत त्यानुसार होणार आहेत.

श्रींचा पलंग काढल्याने विविध संकेतस्थळावर www.vitthalrukminimandir.org, मोबाईल अँप – श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान व खाजगी वृत वाहिनीवर उपलब्ध असलेले विठ्ठलाचाचे दर्शन २४ तास सुरू राहील. मात्र राज्य शासनाने नुकत्याच १४ नोव्हेंबर २०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार विठ्ठलाचे मुखदर्शन कार्तिकी यात्रा कालावधीत कोणत्या दिवशी व वेळी उपलब्ध राहील, यांची नव्याने सूचना मंदिर समिती कडून देण्यात येईल अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

 

News English Summary: State Deputy Chief Minister Ajit Pawar will pay homage to Lord Vitthal on Karthiki Ekadashi. However, Amol Mitkari, MLA of NCP’s Legislative Council has tweeted that it is not Warakaris who oppose this pooja but Sangh’s spoons. It is not Warakaris who oppose Mahapuja but Rashtriya Swayamsevak Sangh. NCP MLA Amol Mitkari has said that Warakaris should beware of the BJP company which opposes worship under the name of Warakaris. In a tweet yesterday, he criticized the Bharatiya Janata Party.

News English Title: NCP MLA Amol Mitkari criticize on BJP Varkari and Shree Vitthal Mahapuja topic News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या