3 December 2024 10:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्नगाठ बांधणार नाही | तुमको ना भुल पायेंगे - आ. अमोल मिटकरी

NCP MLA Amol Mitkari

मुंबई, २७ जून | विदर्भ स्वंतत्र राज्य होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा २००४ साली देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री नसताना केली होती. आता त्यांचे लग्न होऊन कित्येक वर्षे उलटली, ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र स्वतंत्र विदर्भाबाबत त्यांनी चक्कार शब्दसुद्धा काढला नाही.

भाजपने विदर्भातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा दिला. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सभेत स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले. इतकेच नाहीतर वेगळ्या विदर्भ राज्याची घोषणा होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी घोषणाही त्यांनी काही वर्षांपूर्वी केली होती. त्यानंतर फडवणीसांचे लग्नही झाले. पाच वर्षे सत्तेत राहूनही वेगळ्या विदर्भाच्या विषयावर ते गप्प आहेत.

त्यात कालच्या ओबीसी आंदोलनावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजून घोषणा करताना ओबीसी समाजाला आश्वासन दिलं आणि त्यांची सर्व जुनी आश्वासनं विरोधकांनी बाहेर काढली. त्यात धनगर समाजाला २०१७ मध्ये दिलेलं जाहीर आश्वासन देखील समाज माध्यमांवर व्हायरल झालं आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील त्यांच्या त्या वेगळ्या विदर्भासंदर्भातील प्रतिज्ञेची आठवण करून देत खिल्ली उडवली आहे..

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: NCP MLA Amol Mitkari criticized opposition leader Devendra Fadnavis over Vidarbha promise news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x