23 December 2024 5:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

ठाकरे-मोदी भेट | कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सारीपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकणारच - आ. अमोल मिटकरी

MLA Amol Mitkari

मुंबई, ०८ जून | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. या भेटीत मराठा आरक्षण या महत्त्वाच्या विषयासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा मोदींना भेटणार आहेत. या भेटीकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहेच, शिवाय महाराष्ट्रातील राजकीय पक्षही या भेटीकडे लक्ष ठेवून आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, ठाकरे-मोदी भेटीवरुन भाजपवर निशाणा साधला. अमोल मिटकरींनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील. परंतु कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकल्याशिवाय राहणार नाही”, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

याशिवाय अमोल मिटकरींनी दुसरं ट्विट करुन, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावरही घणाघात केला. “अजून बैठकीला सुरुवात पण झाली नाही आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारवर बोलायला लागले.अर्थ स्पष्ट आहे भाजपा मानसिक दृष्ट्या थकलेला पक्ष झाला आहे. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसर त्यांच्याकडे काही शिल्लक नाही”, असं मिटकरी म्हणाले.

 

News English Summary: NCP MLA Amol Mitkari targeted BJP after the Thackeray-Modi meeting. Amol Mitkari attacked BJP state president Chandrakant Patil and opposition leader Devendra Fadnavis.

News English Title: NCP MLA Amol Mitkari not sure about Devendra Fadnavis and Chandrakant Patil even after CM Uddhav Thackeray and PM Narendra Modi meet news updates.

हॅशटॅग्स

#AmolMitkari(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x