2 February 2025 8:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Loan EMI Alert | कर्ज घेण्याचा विचार करताय, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, पुढे अडचणी वाढणार नाहीत PPF Scheme | PPF योजनेतून लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार, केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारं 68 लाखांचे रिटर्न Vivo Y58 5G | विवोच्या 50MP कॅमेरासह येणाऱ्या 'या' जबरदस्त स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, स्वस्तात मस्त स्मार्टफोन SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 7 म्युच्युअल फंडांची यादी सेव्ह करा, वेगाने वाढेल पैशाने पैसा, नोकरदारांचे खास पसंती New Income Tax Slab | पगारदारांनो, तुमचं 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न टॅक्स फ्री कसं झालं 'या' चार्टमधून जाणून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - BSE: IRB Bonus Share News | जबरदस्त संधी, ही कंपनी 1 शेअरवर 1 फ्री बोनस शेअर देणार, फायदा घ्या - BSE: 512008
x

ताईंनी कौरावांना चांगलंच झोडपलं | पण तुमचे पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका

MLA Amol Mitkari

अकोला, १४ जुलै | पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा हेच माझे नेते आहेत. मी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी नेता आहे. महाराष्ट्राच्या पदावर मी नाही. माझे नेते हे राष्ट्रीय स्तरावरचे आहेत, असा खणखणीत इशारा भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी मंगळवारी दिला.

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला नाकारले:
‘माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा व जे. पी. नड्डा आहेत. त्यांच्या मनात काहीतरी चांगले आहे, असा मला विश्वास आहे,’ असे म्हणत पंकजा यांनी राज्यातील भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा एकदाही नामोल्लेख केला नाही. तसेच त्यांचे नेतृत्व आपण मानत नाही, असे अप्रत्यक्षपणे सूचित केले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अकोल्यातील विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला असून नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका असं म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीट केलं असून या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलं असल्याचं म्हटलं आहे.

ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत. नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका,” असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP MLA Amol Mitkari tweet after BJP leader Pankaja Munde called in Mumbai Karyakarta meeting news updates.

हॅशटॅग्स

#AmolMitkari(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x