राष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही आर्थिक मदत | ९ देशातून 1 कोटी 20 लाखांची मदत
पारनेर, ११ मे | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे सध्या चर्चेचा विषय ठरलेले आहेत. पारनेरमध्ये उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये आमदार निलेश लंके रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेसाठी इथेच मुक्काम करत आहेत. निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने हे कोविड सेंटर उभारले आहे. आता याची महती संपूर्ण जगभरात पसरताना दिसत असून, जगभरातून मदतीचा हात या कोविड सेंटरसाठी पुढे केला जात आहे.
पारनेरला आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर मुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळालाय. विशेष म्हणजे आमदार लंके स्वतः रात्रंदिवस या कोविड सेंटर मधील रुग्णांची देखभाल करत आहेत. त्यामुळे लंके यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कोविड सेंटर सुरू केल्यापासून आतापर्यंत भरभरून मदत या सेंटरला मिळाली आहे.
राष्ट्रवादीचे निलेश लंके यांनी उभारलेल्या 1 हजार 100 बेडच्या भव्य कोविड सेंटरमधील 100 बेडला ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरला केवळ परदेशातून 1 कोटी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. निस्वार्थी भावनेने काम केलं तर हजारो हात देणारी असतात, असं मत निलेश लंके यांनी व्यक्त केलं. आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत पाच हजाराहून अधिक लोकांनी मोफत उपचार घेऊन सुखरुप घरी परतले तर आता दुसर्या लाटेत 14 एप्रिलपासून सुरु केलेल्या या कोविड सेंटरमध्ये 2,500 लोक उपचार घेऊन घरी परतले आहेत. सध्या एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
News English Summary: Oxygen has been provided to 100 beds in the grand Covid Center of 1,100 beds set up by NCP’s Nilesh Lanka. The Covid Center has received financial assistance of Rs 1 crore 20 lakh from abroad alone. If we work with selfless spirit, there are thousands of people who give their hands, said Nilesh Lanka.
News English Title: NCP MLA Nilesh Lanke covid care center getting help from foreign countries news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो