15 November 2024 4:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

पडळकरांनी बोलताना काळजी घ्यावी, अशी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही - आ निलेश लंके

NCP MLA Nilesh Lanke

पारनेर, ०१ जुलै | गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर खालच्या शब्दात केली. ‘रात गेली हिबेशात, पोरगं नाही नशिबात’, अशा शब्दात त्यांनी पवारांवर टीका केली होती. शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी खालच्या दर्जाची भाषा केली होती. तसंच सगळे जण पवारांना मोठा नेता मानत असतील पण मी मानायला तयार नाही, असंही पडळकर म्हणाले होते. पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरल्याने राष्ट्रवादीचे अनेक नेते सध्या पडळकरांचा समाचार घेताना दिसत आहेत. अशातच लंकेंनी अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेतली जाणार नाही, असा उघड इशाराच पडळकरांना दिला आहे.

राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. शरद पवार देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर खालच्या शब्दात बोलणं शंभर टक्के चुकीचं असल्याचं सांगत अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेणार नाही, असा इशाराच पडळकरांना दिला आहे.

शरद पवार हे देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर अशा शब्दात बोलणं शंभर टक्के चुकीचं आहे. महाराष्ट्राची भूमी ही महिलांचा मानसन्मान करणारी भूमी असून अश्याप्रकारे वक्तव्य करणं हे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. पडळकरांच्या वक्तव्याचा मी निषेध करत करतो. इथून पुढे बोलताना त्यांनी काळजी घ्यावी, अशी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही, असं लंके यांनी म्हटलंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP MLA Nilesh Lanke slams BJP MLA Gopichand Padalkar after statement against Sharad Pawar news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x