पवार साहेबांच्या त्या पत्रात साखर उद्योगासह कुक्कुटपालन व इतर उद्योगांचाही उल्लेख
मुंबई, १६ मे : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी साखर उद्योगांसाठी पाऊल उचलले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी काही शिफारशी आणि मागण्या केल्या होत्या. याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रातील काही तपशीलवार मुद्दे शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले होते.
मोदींना लिहलेल्या पत्रात पवार यांनी म्हटलं होतं, कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात जाहीर करण्यात आलेल्या अभूतपूर्व लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक उद्योगांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. साखर उद्योगाचाही यात समावेश आहे. साखर उद्योगाला यातून बाहेर काढण्यासाठी आपण त्वरित हस्तक्षेप करून विविध उपाययोजना जाहीर कराव्यात अशी विनंती साखर कारखाने महामंडळ लिमीटेडच्या वतीनं करण्यात आली आहे.
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीपासूनच साखर उद्योग संकटात होता. त्यावेळी आपण इथेनॉलच्या उत्पादनासाठी किमान हमीभाव, साखरेची निर्यात, राखीव साठा, भांडवली खर्चावरील व्याजापोटी दिले जाणारे अनुदान इत्यादी आर्थिक उपाययोजना करण्यावर भऱ दिला. आता कोविड-१९ चे संकट दिवेंदिवस गडद होत चालले असतानाही आपण काही धोरणात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात साखर कारखाने महामंडळ लिमीटेडने काही उपाययोजना पवार यांनी सुचवल्या आहेत.
त्यानंतर निलेश राणेंनी टीका करताना म्हटलं होतं, “साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालचं पाहिजे. साखर कारखाने कोट्यवधींची उलाढाल करतात. राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षोंनवर्षे साथ देत आलेत. तरी वाचवा?,” असं म्हणत राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला होता.
त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर देताना म्हटलं आहे की, “मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी.
मी आपणास सांगू इच्छितो की @PawarSpeaks साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात.
त्यामुळे काळजी नसावी. https://t.co/Fqe9QWKBlQ— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 16, 2020
News English Summary: NCP MLA Rohit Pawar, while replying, said, “I would like to inform you that Mr. Sharad Pawar has sent a letter to the Center regarding sugar industry, poultry farming and other industries. Prime Minister Modiji also thinks positively about it as Saheb presents everything meticulously. So don’t worry.
News English Title: NCP MLA Rohit Pawar Answer To Bjp Nilesh Rane Over Sharad Pawar Letter To Pm Narendra Modi News latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON