27 April 2025 7:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | मजबूत परतावा देणारा शेयर; टाटा स्टील शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL NTPC Share Price | एनटीपीसी शेअर पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 464% परतावा दिला - NSE: NTPC Horoscope Today | 27 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

कोरोनाने मेंदूवर परिणाम होत असल्याचं बरळत आपले संस्कारच दाखवून देत आहेत - रोहित पवार

NCP MLA Rohit Pawar, BJP MLA Atul Bhatkhalkar, Anil Deshmukh

मुंबई, ०९ फेब्रुवारी: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे राज्याच्या राजकारणातही पडसाद उमटत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आंदोलनासंदर्भात ट्विट करण्यात आल्यानंतर देशातील क्रीडा आणि कला क्षेत्रातील सेलिब्रिटींनी ट्विट करत भाष्य केलं होतं.

सेलिब्रिटींनी मोदी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केल्याचा सूर सोशल माध्यमांवर उमटला. काही जणांच्या ट्विटमध्ये साधर्म्य असल्याचं सांगत काँग्रेसनं ट्विट प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.

देशमुख यांनी चौकशी करण्यात येईल, असं जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी कोरोनाचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली. भातखळकर यांच्या ट्विटवर नाराजी व्यक्त करत रोहित पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या संस्कारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “विद्वान व्यक्ती नम्र असते अन पोकळ व्यक्ती उथळ पाण्यासारखं खळखळ करते! भाजपाच्या नेत्यांसह अनेकांना करोना झाला, तेव्हा त्यांना बरं होण्यासाठी आम्ही शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्षाचे उथळ नेते शुभेच्छा देतच नाहीत, पण करोनामुळं मेंदूवर परिणाम होत असल्याचं बरळत आपले संस्कारच दाखवून देत आहेत,” अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

काय म्हणाले होते भातखळकर?

 

News English Summary: After Deshmukh announced that an inquiry would be held, BJP leader MLA Atul Bhatkhalkar criticized him, referring to Corona. Expressing displeasure over Bhatkhalkar’s tweet, Rohit Pawar has questioned the rites of the BJP leaders. “A learned man is humble, and a hollow man shouts like shallow water! When many, including the BJP leaders, lost their tempers, we wished them well. The shallow leaders of the Bharatiya Janata Party (BJP) are not only wishing good luck, but also showing their culture by saying that corona affects the brain, ”said MLA Rohit Pawar.

News English Title: NCP MLA Rohit Pawar criticised BJP MLA Atul Bhatkhalkar news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या