15 November 2024 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

राज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज - आ. रोहित पवार

Corona Crisis, BJP Maharashtra, MLA Rohit Pawar

मुंबई, २२ मे : कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात उद्धव ठाकरे सरकारला अपयश आल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यभरात आंदोलन केलं. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेनं उपरोधिक शब्दांत उत्तर दिलं आहे. देवेंद्र भौ, आमचं चुकलंच, असं म्हणत शिवसेनेनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर दिलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत महाराष्ट्रातील जनतेची काळजी वाहत आहेत, त्यांची जबाबदारी घेत आहेत. कोविड सेंटर उभारून रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. भाजपच्या नेत्यांसारखे टाळ्या, थाळ्या वाजवायला आणि दिवे लावून चमकायला सांगत नाहीत. म्हणून देवेंद्र भौ, आमचं चुकलंच!, असा टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी लगावला आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील भाजपाला जोरदारपणे लक्ष केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज असल्याचं म्हणत रोहित पवार यांनी भाजपाच्या आदोलनावर टीका केली आहे.

“मास्क वापरण्याचा आणि अंतर ठेवण्याचा नियम वगळता हे सगळं नाटकाच्या स्क्रिप्टप्रमाणेच वाटलं. आज राज्याला अशा नाटकाची नाही तर सहकार्याची गरज आहे. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो, राज्यातील लोकांचा आणि कोरोना वॉरियर्सचा अपमान करू नका,” असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून भाजपाच्या आंदोलनावर निशाणा साधला.

 

News English Summary: NCP MLA Rohit Pawar has targeted BJP. Rohit Pawar has criticized the BJP’s agitation saying that the state needs cooperation and not drama.

News English Title: NCP MLA Rohit Pawar Criticize Bp Leaders Protest In Maharashtra Corona virus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x