युतीत असताना बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? - रोहित पवार
मुंबई, ३० एप्रिल | महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. चढला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुळ भातखळकर यांना चांगलंच धारेवर धरलंय. “युतीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,” असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
कोरोनाच्या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी केंद्रातील संसदभवानाच्या बांधकामावर टीका केली होती. त्याची दखल घेत अतुल भातखळकर यांनी काही ट्विट करत रोहित पवार यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पवार यांनी वरिल वक्तव्य ट्विटद्वारे केलं आहे.
आमदार रोहित पवार यांनी ट्विट करताना म्हटलं की, “युतीत असताना बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते. आता ते फक्त उद्धवजींचे वडील?. भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,” असे रोहित पवार ट्विटद्वारे म्हणाले आहेत.
युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? 🤔भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच. https://t.co/lbtj30GEWr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 29, 2021
त्यानंतर “मुख्यमंत्री ४०० कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा रोहित पवारजी. आपल्या गृहमंत्र्याने फक्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी,” असे म्हणत अतुल भातखळकरांनी रोहित पवारांवर टीकेचा बाण सोडला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून रोहित पवारांवर पुन्हा टीका केली.
News English Summary: MLA Rohit Pawar tweeted, “Balasaheb Thackeray was a Hindu hriday samrat for you when you were in the alliance. Now he is just Uddhavji’s father ?. It was heard that emotions and roles are beyond power. But your feelings changed as soon as you came to power. If you want to change such a convenient role, you are the one, ”Rohit Pawar said in a tweet.
News English Title: NCP MLA Rohit Pawar criticized BJP MLA Atul Bhatkhalkar on his tweet regarding CM Uddhav Thackeray news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो