मतदान मागण्याच्या वेळीही मला फ्लेक्सवर जाहिरात करण्याची गरज पडणार नाही - आ. रोहित पवार
पुणे, २४ ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी व राज्यात महा विकास आघाडीचे सरकारला एक वर्ष पूर्ण झाली. मात्र राष्ट्रवादीच्या खासदार कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या एक वर्षात फक्त कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बी बियाणे इकडे आणून विकली. अशी गंभीर टीका भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी राम शिंदे बोलत असतांना त्यांनी रोहित पवार यांचावर खोचक टीका केली आहे. `बारामती पॅटर्न राबवू,` याबाबत जनतेची घोर निराशा झाली असून, कर्जतमधील विकासाची घोडदौड थांबली आहे. वर्षभराचा लेखाजोखा पाहता कर्जत- जामखेडमधील विकासाचे नवे पर्व अपयशी ठरले आहे, अशी घणाघाती टीका राम शिंदे यांनी केली.
“मी केलेल्या कामांचं भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते झालं असताना ते पुन्हा भूमिपूजन करत आहेत. तुकाई उपसा सिंचन योजनेसह अनेक कामं बंद पाडली,” अशी टीका राम शिंदे यांनी रोहित पवारांवर केला. “बारामती पॅटर्न सपशेल अपयशी ठरला असुन लोकांची घोर निराशा झाली आहे,”असंही ते म्हणाले. नवीन पर्व असं काही नसून सगळं खोटं असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच फेसबुक पोस्टद्वारे आपल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला आहे. रोहित पवार म्हणाले कि, कर्जत-जामखेडवासियांनी प्रचंड विश्वासाने माझ्या अंगावर विजयाचा गुलाल टाकला, या घटनेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय. तसं पाहिलं तर आमदार म्हणून काम करताना एक वर्षाचा कालावधी हा खूप छोटा असतो, पण तरीही गेल्या वर्षभरात माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी काय केलं याची गोळाबेरीज इथल्या जनतेसमोर मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो.
कामाचा हिशेब मांडत असताना तो काही मी मतं घेण्यासाठी मांडत नाही आणि मतदान मागण्याच्या वेळीही हा हिशेब मला ‘फ्लेक्स’वर मांडून जाहिरात करण्याची गरज पडणार नाही. कारण तोपर्यंत बहुतांश कामे ही पूर्ण झाल्याने लोकांना डोळ्याने दिसतील. असो, असे उत्तर रोहित पवार यांनी राम शिंदेंना दिले आहे. कर्जत-जामखेडच्या विकासाची पेरणी केली असून प्रयत्नांची मेहनत आणि सर्वसामान्य जनतेच्या साथीचं खत घालून कर्जत-जामखेडच्या मातीत विकासाचं पीक काढण्याचा माझा प्रयत्न आहे. हे पीक लवकरच बहरात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
वर्षभरातील कामांचा हा लेखा जोखा मांडत असताना विरोधकांनीही केवळ विरोधासाठी विरोध न करता कर्जत-जामखेडच्या विकासासाठी सहकार्य करावं, असं माझं आवाहन आहे. कारण इथं कुण्या ‘एका व्यक्तीचा’ विकास करण्याचं काम सुरू नाही तर संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याचं काम सुरुय, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
News English Summary: An account of your work is presented through a Facebook post. Rohit Pawar said, “The people of Karjat-Jamkhed threw victory on me with great faith. Today marks one year since this incident.” The term of one year as an MLA is very short, but I still feel it is my duty to present to the people what I have done for the development of my constituency over the last year.
News English Title: NCP MLA Rohit Pawar reply to BJP Ex MLA Ram Shinde over Karjat Jamkhed develeopment issues News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH