23 February 2025 7:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

भाजप सरकारमध्ये मंत्री अहवाल तयार करायचे आणि सचिव स्वाक्षरी करायचे का असा प्रश्न पडलाय

NCP MLA Rohit Pawar, Devendra Fadnavis, IPS Rashmi Shukla case

मुंबई, २७ मार्च: राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली. मात्र प्रत्यक्षात खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. ही बाब उघड होताच शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी मागितली. तसेच फोन टॅपिंगचा अहवाल परत घेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र हा अत्यंत गोपनीय अहवाल शुक्ला यांनीच फोडला, असा संशय असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता शुक्ला यांच्यामागेच चौकशीचे ‘शुक्लकाष्ठ’ लागण्याची शक्यता आहे.

राज्यात पोलिस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असून त्यासंदर्भात गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अहवालाने गेला आठवडाभर खळबळ माजलेली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल सार्वजनिक करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, सदर अहवाल मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी तयार केला आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यावर केवळ सही केल्याचा आरोप पुन्हा फडणवीस केला. त्यानंतर फडणवीसांवर देखील पुन्हा टीका सुरु झाली.

याच विषयाला अनुसरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांचावर टीका केली आहे. दोन ट्विट करताना रोहित पवार यांनी फडणवीसांना प्रतिउत्तर देताना म्हटलं आहे की , “राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करून त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचे काही ‘अनुभवी’ नेत्याचं म्हणणे आहे. म्हणून भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत का,असा प्रश्न मला पडला. पण हे सरकार व मुख्य सचिव असं करणार नाही याची खात्री आहे”, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

मुख्य सचिवांच्या अहवालातील अनेक बाबी धक्कादायक आहेत. मविआ सरकारला बदनाम करण्यासाठीच ‘फोन टॅपिंग’चं षडयंत्र रचण्यात आलं काय, अशी शंका या अहवालावरून येतेय. तसंच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय गोळ्या झाडण्याची अशी प्रथा पडली तर भविष्यात प्रशासनाला काम करणंही अवघड होईल, असे रोहित पवार यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

News English Summary: Some ‘experienced’ leaders say that the report prepared by the Chief Secretary of the State was prepared by the Minister and only signed by the Chief Secretary. So I wondered if the report was prepared in the same way when the BJP government was in power. But I am sure that the government and the chief secretary will not do that, ”tweeted MLA Rohit Pawar.

News English Title: NCP MLA Rohit Pawar slams Devendra Fadnavis over his statement regarding report of IPS Rashmi Shukla case news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x