22 January 2025 10:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण | रोहित पवारांनी झापलं

MLA Rohit Pawar

मुंबई, १४ एप्रिल: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हातावर पोट असलेले मजूर आणि छोट्या व्यवसायिकांसाठी आर्थिक पॅकेज देऊ केलंय. परंतु, हे पॅकेज म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचं काम असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारला काही सूचना केल्यात. त्यावरुन आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला एकप्रकारे आसरा दाखवलाय. रोहित पवारांनी एक फेसबुक पोस्ट लिहून भाजपशासित राज्यातील परिस्थिती विरोधकांच्या नजरेस आणून दिलीय.

भाजपशासित राज्यांमध्येही कोरोना संकट भीषण असून, तेथे कोरोनाचे व्यवस्थापक चांगले असल्याचा विरोधकांचा दावा फोल ठरतो, असे सांगत पवार यांनी महाविकास आघाडी सरकारची बाजू उचलून धरली आहे. यासंदर्भात ट्विट करताना आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय की, “मला विरोधकांनाही सांगायचंय की ही वेळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची नसून एकत्रितपणे संकटाचा मुकाबला करण्याची आहे. ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीवरुन राजकारण करणं थांबवत नाहीत, हे दुर्दैवी वाटतं. आज राजकारणाची वेळ नसतानाही महाराष्ट्रातील सरकार असमर्थ आहे, इथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली अशाप्रकारची विधानं विरोधकांकडून केली जात आहेत. ही गोष्ट मात्र निश्चितच खरीय की महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त आहे आणि रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होतेय. परंतु, हे संकट रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सर्व राज्यसरकार करतंय हेही तेवढंच खरंय. राज्यात परत एकदा नाईलाजास्तव कठोर निर्बंध घालण्याची वेळ सरकारवर आली, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

मागील वर्षी जानेवारी महिन्यात देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तेंव्हापासून अविरतपणे आपण या संकटाला तोंड देत आहोत….

Posted by Rohit Rajendra Pawar on Tuesday, April 13, 2021

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray has announced a 15-day lockdown to curb the spread of corona in the state. At this time, the Chief Minister has offered a financial package for laborers and small businessmen. However, Bharatiya Janata Party (BJP) state president Chandrakant Patil has criticized the package as a “mouthpiece”.

News English Title: NCP MLA Rohit Pawar slams State BJP leaders over politics on corona crisis news updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x